मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

वाढदिवशी नितीन गडकरींकडून नागरिकांना रिटर्न गिफ्ट; 7000 नाही तर अवघ्या 1200 रुपयात ब्लॅक फंगसचं इंजेक्शन

वाढदिवशी नितीन गडकरींकडून नागरिकांना रिटर्न गिफ्ट; 7000 नाही तर अवघ्या 1200 रुपयात ब्लॅक फंगसचं इंजेक्शन

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. आणि आजच्या दिवशी त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 27 मे : ब्लॅक फंगसवरील (Mucormycosis)  उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत बाजारात 7000 रुपयात मिळणारं हे इंजेक्शन अवघ्या 1200 रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचं उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे. जेनटेक लाइफ सायन्सची दररोज तब्बल 20,000 वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे.

दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालय हे केंद्राकडून निर्णय येईपर्यंत काळ्या बुरशीच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयातकांद्वारे करार पत्रावर एम्फोटेरिसिन बीवर कररहित आयात करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की, लोकांचा जीव वाचविण्यासाठी काळ्या बुरशीवरील औषधांची गरज आहे.

हे ही वाचा-Black Fungusच्या रुग्णांना दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध

या औषधांचं उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने पाच आणखी कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीसाठी परवाना उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने दिलासादायक घोषणा केली आहे. Liposomal Amphotericin B हे औषध ब्लॅक फंगस अर्थात म्‍यूकरमायकोसिसच्या (Mucormycosis) उपचारांसाठी वापरलं जातं. त्याची भारतात विक्री करण्यासंदर्भातल्या करारावर या दोन्ही कंपन्यांनी स्वाक्षरी केली असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

First published:

Tags: Corona updates, Nitin gadkari