मुंबई, 2 ऑक्टोबर : रिलायन्स लाईफ सायन्स यांनी कोरोनाच्या संकटात मोठी निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या RT-PCR किटमधून अवघ्या 2 तासांत कोरोना टेस्टचा निकाल समोर येऊ शकतो.
सद्यस्थितीत Covid -19 RT-PCR चाचणीसाठी 24 तासांचा अवधी लागतो. हा वेळ प्रयोगशाळेत वास्तवित वेळेत कोणत्याही विषाणूच्या डीएनए आणि आरएनएमध्ये तपास करतो आणि सार्स-कोविड -2 मध्ये असलेल्या न्यूक्लिक अम्ल ओळखतो. मात्र रिलायन्सच्या नव्या किटमुळे हा निकाल अवघ्या 2 तासात येऊ शकतो. कंपनीच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी देशात सार्स-कोविड-2 च्या 100 हून अधिक जीनोमचं विश्लेषण केलं आहे आणि या आधुनिक आरटी-पीसीआर किट विकसित केलं आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या किटला ‘आरटी-ग्रीन किट’ चं नाव देण्यात आलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) याला मान्यता देण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे किट सार्स-कोव-2 च्या आय-जीन, आर-जीन, आरडीआरपी जीनच्या उपस्थितीत लक्षात येऊ शकतं.
दरम्यान देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Coronavirus Cases in India) दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (Corona) 81 हजार 484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 1095 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 94 हजार 69 झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा 99 हजार 773 वर झाला. धक्कादायक म्हणजे देशात दररोज सरासरी 1100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. देशात कोरोना आलेख झपाट्यानं वर सरकत आहे. तर अमेरिका (America)आणि ब्राझील (Brazil) सारख्या देशात कोरोनाचा आलेख खाली सरकताना दिसत आहे. या देशातमध्ये दररोज सरासरी 800 रुग्णांचा मृत्यू होत आहे. जगभरात आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 81 हजार 663 नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर आतापर्यंत 10 लाख 27 हजार 653 नागरिकांचा कोरोनानं बळी घेतला आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार 660 नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर ब्राझिलमध्ये 1 लाख 44 हजार 767 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. ही वाढ कायम राहिल्यास मृतांचा आकडा येत्या काही दिवसांत एक लाखाच्या वर पोहोचेल, अशी भीती वर्तवली जात आहे.