मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Red Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष

Red Wine ठरतेय Corona वर जालीम उपाय, वाचा Interesting निष्कर्ष

रेड वाईन पिणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असं नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.

रेड वाईन पिणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असं नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.

रेड वाईन पिणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, असं नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 23 जानेवारी: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शरीरावर होणारा दुष्परिणाम (Impact on body) कमी करण्यासाठी रेड वाईन (Red Wine) सर्वोत्तम उपाय (Best Solution) ठरत असल्याचं नव्या संशोधनातून (New Research) समोर आलं आहे. अल्कोहोल आणि अल्कोहोलयुक्त पेयांमुळे कोरोना विषाणूवर विपरित परिणाम होत असल्याचं ताज्या संशोधनातून समोर आलं आहे. नियमित रेड वाईन पिणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाचा कमी धोका असल्याचं ताज्या संशोधनातून दिसून आलं आहे.

काय आहे संशोधन?

ज्या व्यक्ती दर आठवड्याला पाच ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक रेड वाईन पितात, त्यांना इतरांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचा धोका हा 17 टक्के कमी असतो, असं या संशोधनातून दिसून आलं आहे. त्याचाच अर्थ रेड वाईनच्या नियमित सेवनामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते आणि रेड वाईनमध्ये असणारे घटक हे कोरोना विषाणूला संपवण्यासाठी आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात, हे नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार रेड वाईनमध्ये असणाऱ्या पॉलिफेनॉल हा घटक त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. या घटकामुळे कोरोना किंवा श्वसनसंस्थेवर परिणाम करणाऱ्या जातकुळीतील सर्वच व्हायरसचा प्रभाव कमी होत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे.

हे वाचा- पाकिस्तानी YouTuber ला तुरुंगवास, Mob Lynching चं केलं होतं समर्थन

इतर पेय आणि परिणाम

रेड वाईनपेक्षा व्हाईट वाईनमध्ये हा घटक तुलनेनं कमी असतो. त्यामुळे आठवड्यातून चार ग्लास व्हाईट वाईन पिणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही 8 टक्के कमी असते. मात्र व्हाईट वाईन ही रेड वाईनपेक्षा कमी प्रभावी ठरते, हेदेखील या संशोधनातून सिद्ध झालं आहे. बिअर किंवा इतर अल्कोहोलयुक्त द्रव्यांमुळे मात्र कोरोनाची शक्यता बळावत असल्याचं या संशोधनातून दिसून आलं आहे. इतर अल्कोहोलीक द्रव्यांचं सेवन केल्यामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होण्याऐवजी ती इतरांपेक्षा 28 टक्के वाढत असल्याचंही या संशोधनातून समोर आलं आहे.

First published:

Tags: Alcohol, Corona, Coronavirus, Liquor stock