मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाचा प्रसार चीनमधूनच झाला? या 10 महत्त्वाच्या कारणांमुळं बळावतोय संशय

कोरोनाचा प्रसार चीनमधूनच झाला? या 10 महत्त्वाच्या कारणांमुळं बळावतोय संशय

नोव्हेंबर 2019 च्या सुमारास चीनमधील (China) वुहानमध्ये (Wuhan) हा विषाणू सापडल्याची बातमी पुढं आली. यानंतर हा विषाणू वटवाघळाच्या (Bat) माध्यमातून माणसापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं.

नोव्हेंबर 2019 च्या सुमारास चीनमधील (China) वुहानमध्ये (Wuhan) हा विषाणू सापडल्याची बातमी पुढं आली. यानंतर हा विषाणू वटवाघळाच्या (Bat) माध्यमातून माणसापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं.

नोव्हेंबर 2019 च्या सुमारास चीनमधील (China) वुहानमध्ये (Wuhan) हा विषाणू सापडल्याची बातमी पुढं आली. यानंतर हा विषाणू वटवाघळाच्या (Bat) माध्यमातून माणसापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं.

नवी दिल्ली 05 जून :  जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसाराला (Corona Virus Pandemic) सुरुवात होऊन दीड वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. सध्या पसरलेल्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave) कहर लवकरच संपेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सगळ्या जगाला वेठीला धरणारा, जगभरात हाहाकार माजवणारा हा कोरोनाचा विषाणू आला तरी कुठून? याचे मूळ नेमके कोठे आहे? अमेरिकेसह अनेक देश या प्रश्नाची उकल करण्यासाठी याचा अधिक सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

कोरोना विषाणूचा उगम शोधण्याची गरज काय ?

कोरोना विषाणूचा उगम कुठे झाला याबद्दल अनेक सिद्धांत आतापर्यंत मांडण्यात आले आहेत. त्यामुळं आजही तज्ज्ञांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सगळेच याबाबतीत संभ्रमात आहेत. नोव्हेंबर 2019 च्या सुमारास चीनमधील (China) वुहानमध्ये (Wuhan) हा विषाणू सापडल्याची बातमी पुढं आली. यानंतर हा विषाणू वटवाघळाच्या (Bat) माध्यमातून माणसापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं. आतापर्यंत अनेक सिद्धांत, केस स्टडीज आणि तपास करूनही सत्य समोर आलेलं नाही. पण हा विषाणू नेमका कुठून आला हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भविष्यातील अशा आपत्तींपासून वाचण्यासाठी हा शोध अतिशय महत्वाचा आहे.

चिंता वाढवणारी बातमी; HIV Positive महिलेच्या शरीरात 216दिवस राहिला कोरोना विषाणू

वूहान प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याच्या सिद्धांताबाबत काही महत्त्वाच्या बाबी :

1) आजही कोविड-19 आजाराच्या साथीला कारणीभूत ठरणारा कोरोना विषाणू चीनमधील एका प्रयोगशाळेत (Lab) निर्माण झाल्याचं अद्याप सिद्ध झालेले नाही.

2) चीननं आपल्या प्रयोगशाळेमधून हा विषाणू पसरल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळला असून, उलट चीननं अमेरिकेसह इतर काही देश लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी या साथीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

3) चीन कोरोना विषाणूचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात सातत्यानं अडथळा आणत आहे. यामुळेचा चीनबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. चीनकडे लपवण्यासारखे काहीही नाही तरी तो याबाबत अडथळे का आणत आहे. लपवाछपवी का करत आहे

4) 2012 मध्ये सहा खाणकामगार आजारी पडल्याच्या आणि युनानच्या दक्षिण-पश्चिमेकडील एका वटवाघळाच्या गुहेत गेलेल्या वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (Wuhan Institute of Virology) तीन संशोधकांची तब्येत बिघडल्याच्या वृत्तानंतर या प्रयोगशाळेमधून विषाणूचा प्रसार झाल्याचं समोर आलं.

5) या सिद्धांताचे अनेक पैलू आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे खाण कामगारांना एसएआरएस-सीओव्ही -2च्या (SARS Cov-2) कुटुंबातील एका विषाणूची लागण झाली त्यामुळं कोविड-19ची उत्पत्ती झाली. यानंतर, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये झालेल्या संशोधनातील काही चुकांमुळे 2019 मध्ये या आजाराची साथ उद्भवल्याचे म्हटलं जाऊ लागलं.

6) अनेकांनी या सिद्धांताची चेष्टा केली, परंतु यावर विश्वास असणाऱ्या लोकांनी पुराव्यावर पुरावे समोर आणणं सुरू ठेवलं. वटवाघळाच्या सिद्धांतापासून ते इंटरनेटवरून कागदपत्रे हटवण्यापर्यंतच्या अनेक बाबी त्यांनी समोर आणल्या. त्यावर चीन आक्षेप घेत असल्याचं निदर्शनास आणलं.

7) यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे. याचे नेतृत्व करणारे लोक स्वतःला डीसेंट्रलाइज्ड रॅडिकल ऑटोनोमस सर्च टीम इनव्हेस्टिगेटिंग कोविड-19  म्हणजेच ड्रॅस्टिक (DRASTIC) म्हणून संबोधत आहेत. या गटात काही भारतीयांचाही समावेश आहे.

8) त्यामध्ये पश्चिम बंगालमधील (West Bengal) 20 वर्षांचा एक तरुण प्रमुख आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ‘द सीकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरूणाचा न्यूज वीकच्या एका लेखातही उल्लेख करण्यात आला आहे.

9) वूहान प्रयोगशाळा सिद्धांताची चर्चा फेब्रुवारी 2020 पासून सुरू झाली. याबाबतच्या शोधनिबंधात चिनी संशोधकांनी वटवाघळाच्या जीनोमशी जुळणारा हा कोरोना विषाणू कदाचित प्रयोगशाळेत तयार झाला असावा अशी शंका व्यक्त केली होती. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांनी हे निष्कर्ष नाकारले आणि हे संशोधन नंतर मागं घेण्यात आलं.

10) आता पुन्हा कोरोना विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेत झाल्याबद्दल सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाल्यानं वैज्ञानिक पुन्हा एकदा याच्या संशोधनाकडे वळले आहेत. अमेरिकेचे (USA) अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी तीन महिन्यांत याबाबत इंटेलिजेंस रिपोर्ट तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

First published:

Tags: Corona spread, Coronavirus