मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लसीकरण आपल्या दारी, ग्रामपंचायतीतच लस मिळत असल्याने पायपीट थांबली, गर्दीही टळली

लसीकरण आपल्या दारी, ग्रामपंचायतीतच लस मिळत असल्याने पायपीट थांबली, गर्दीही टळली

Ratnagiri Vaccination News मागेल त्या ग्रामपंचायतीला एक वार ठरवून लस आपल्या दारी या मोहिमेच्या आधारे लसीकरण होत असल्याने, नियोजनबद्धरित्या मोहीम पार पडत आहे.

Ratnagiri Vaccination News मागेल त्या ग्रामपंचायतीला एक वार ठरवून लस आपल्या दारी या मोहिमेच्या आधारे लसीकरण होत असल्याने, नियोजनबद्धरित्या मोहीम पार पडत आहे.

Ratnagiri Vaccination News मागेल त्या ग्रामपंचायतीला एक वार ठरवून लस आपल्या दारी या मोहिमेच्या आधारे लसीकरण होत असल्याने, नियोजनबद्धरित्या मोहीम पार पडत आहे.

रत्नागिरी, 04 जून : जिल्हायात लसींचा तुटवडा (vaccine shortage) आणि लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी यासाठी प्रशासनानं नामी उपाय शोधला. लस आपल्या दारी उपक्रमांतर्गत (Vaccination at Your doorstep) लोकांना गावागावत लस उपलब्ध करून दिली जात आहे. गावातील लसीकरण केंद्रावर येऊन लोक लस घेत आहेत. त्यामुळं केंद्रावर होणाऱ्या गर्दीला (crowd) आळा बसला आहे. त्याचबरोबर नागरिकांची होणारी पायपीटही थांबली आहे. रत्नागिरीच्या हर्णे ग्रामपंचायतीतही या द्वारे लसीकरण मोहीम पार पडली. या उपक्रमामुळं जिल्हयात नियोजनबद्धरित्या लसीकरण होत आहे. शिवाय गर्दीही टाळली जात आहे.

(वाचा-भारतात लहान मुलांना Pfizer ची कोरोना लस देण्याआधी ब्रिटनकडून आली मोठी माहिती)

हर्णे यथील नागरिकांना लसीकरणासाठी आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं लागायचं. त्याठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची. कारण आजूबाजूच्या गावातील नागरिक इथंच लसीकरणासाठी येत होते. त्यामुळं अनेक ज्येष्ठांनाही परतावं लागायचं. वाहनं मिळत नसल्यानं पायपीट व्हायची. त्यामुळं हर्णे ग्रामपंचायतीनं लसीकरणच गावामध्येच घ्यायचं ठरवलं. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी कामाला लागले. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आलं.

(वाचा - मुंबई मनपाला स्पुटनिक लसीचा पुरवठा होणार, डॉ रेड्डी लॅबरोटरीसोबत बोलणी यशस्वी)

मंगळवारी 1 जून रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा हर्णे इथं 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात आलं. 140 डोस प्राप्त झाले होते, त्यापैकी फ्रंटलाईन वर्कर्सना 40 आणि उर्वरित 100 डोस 45 वर्षावरील ग्रामस्थांना देण्यात आले. आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आशिष मारकड यासह अनेकांनी यासाठी प्रयत्न केले.

केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत असल्यानं त्याठिकाणी प्रचंड गर्दी होत होती. तसंच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता. पण आता ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण केलं जात आहे. मागेल त्या ग्रामपंचायतीला एक वार ठरवून लस आपल्या दारी या मोहिमेच्या आधारे लसीकरण होत असल्याने, नियोजनबद्धरित्या मोहीम पार पडत आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Vaccination