मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात झाला होता बलात्काराचा प्रयत्न', मृत्यूनंतर मुलीनं केला हत्येचा आरोप

'कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात झाला होता बलात्काराचा प्रयत्न', मृत्यूनंतर मुलीनं केला हत्येचा आरोप

काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर (Corona patient) बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. या घटनेतील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे

  • Published by:  Kiran Pharate

पटना 21 मे : कोरोनाकाळात (Corona Pandemic) अनेक विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर (Corona patient) बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. या घटनेतील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे, या प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे. आईच्या मृत्यूनंतर मुलीनं ही हत्या असल्याचा आरोप करत शास्त्रीनगर ठाण्यात तक्रार दाखल (Case Registered) केली आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणात छेडछाड आणि हात-पाय बांधल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रुग्णालयातील स्टाफमधील तीन अज्ञांताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण बिहारच्या पटनामधील पारस रुग्णालयातील (Paras Hospital) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला अंगणवाडी सेविका होती आणि ती मुळची नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होती. मुलीनं सांगितलं, की पंधरा वर्षाआधीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मुलीनं असा आरोप केला आहे, की 16 मे रोजी संध्याकाळी सहा आणि 17 मे सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पारस रुग्णालयात तिच्या आईवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला. मुलीनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं, की सध्या आईला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच ती याबद्दलची माहिती देऊ शकेल.

रुग्णालय प्रशासनानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. मुलीनं सांगितलं, की आई माझ्यासोबत पायी चालत रुग्णालयात आली होती, मात्र डॉक्टरांनी माझ्याकडून हे सांगून सही करुन घेतली की आईची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Corona patient, Murder, Rape case