मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अक्षतांसह नवरा-नवरीवर पैशांचा पाऊस; लॉकडाऊनमध्येही असा होता लग्नाचा थाट, पाहा VIDEO

अक्षतांसह नवरा-नवरीवर पैशांचा पाऊस; लॉकडाऊनमध्येही असा होता लग्नाचा थाट, पाहा VIDEO

या लग्नात बारबालांनाही बोलावण्यात आलं होतं. याशिवाय लाखो-कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

या लग्नात बारबालांनाही बोलावण्यात आलं होतं. याशिवाय लाखो-कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

या लग्नात बारबालांनाही बोलावण्यात आलं होतं. याशिवाय लाखो-कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 21 मे : उत्‍तर प्रदेश सरकारने अनेक नियमावली लागू केली असती तरीही लोक लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करीत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसत आहे.  या लग्नात केवळ कोरोनाचे नियमच तोडण्यात आले नाही तर हे लग्न वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे.

लग्नात डान्स फ्लोअरवरचं नाही तर स्टेजवरही नवरदेवावर नोटांचा पाऊस झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, नवरा-नवरी स्टेजवर बसलेले असताना लोक फुलांचा तर काही नोटा उडवित आहेत. दुसरीकडे साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत गिरी यांच्या अडचणीत वाढ होत आहे. निरंजनी आखाड्यातून काढल्यानंतर बंडखोरी करणारे शिष्य स्वामी आनंद गिरी यांच्याद्वारे सातत्याने केलेल्या गंभीर आरोप अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. यामुळे लग्नाच्या व्हायरल व्हिडिओमध्येही ते दिसत आहेत.

या लग्नाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी कोरोना प्रोटोकॉल विसरून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगशिवाय एका लग्न समारंभात दिसले आणि स्टेजवर चढून नवरा-नवरीला आशीर्वाद देताना दिसले. ज्या लग्नात ते आले होते, तेथे शेकडोंची गर्दी आहे. कोणीच मास्क लावलेला नाही. महंत नरेंद्र गिरी यांच्यासमोर अनेक जण बराच वेळ नोटा उडवित असताना दिसत आहे. या लग्न समारंभात बारबालांनीदेखील अश्लील नृत्य केलं.

" isDesktop="true" id="553991" >

महंत नरेंद्र गिरी यांच्या उपस्थिती झालेल्या या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. हे सर्व व्हिडिओ प्रयागराज शहरातील झलवा भागातील एका गेस्ट हाऊसमधील आहेत. आरोप आहे की, लग्नात लाखो-कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कोरोना नियमांचं उल्लंघन करीत शेकडोंची गर्दी जमा झाली होती.

हे ही वाचा-VIDEO: करून दाखवलं! मराठवाड्यातल्या या गावानं कोरोना रुग्णाला पाहिलेलंच नाही!

असाही आरोप आहे की, संपूर्ण आयोजन नरेंद्र गिरी यांच्या देखरेख आणि उपस्थितीत पार पडलं होतं. याशिवाय लाखो रुपये खर्च करून बार-बालांना बोलावण्यात आलं होतं व त्यांनी या लग्नात अश्लील नृत्यही केलं होतं. मात्र नरेंद्र गिरी यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, इतर पाहुण्यांप्रमाणेत त्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Corona spread, Marriage, Viral video.