Home /News /coronavirus-latest-news /

ब्लॅक फंगसचा प्रसार रोखण्यासाठीही PM टाळी अन् थाळी वाजवायला लावणार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

ब्लॅक फंगसचा प्रसार रोखण्यासाठीही PM टाळी अन् थाळी वाजवायला लावणार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

ब्लॅक फंगसवरुन राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर (Modi Goverment) निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, की मोदी सरकारनं योग्य व्यवस्था न केल्यानंच केवळ भारतातच कोरोनासोबतच ही नवी महामारीही पसरली आहे.

    नवी दिल्ली 22 मे : देशात कोरोनापाठोपाठ (Coronavirus) आता ब्लॅक फंगसनं (Black Fungus) हाहाकार घातला आहे. याच मुद्द्यावरुन आता राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, की मोदी सरकारनं योग्य व्यवस्था न केल्यानंच केवळ भारतातच कोरोनासोबतच ही नवी महामारीही पसरली आहे. मागील वर्षी लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यावरुनच पंतप्रधानांवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, की मोदी यावेळी ब्लॅक फंगससोबत लढा देण्यासाठीही थाळी आणि टाळी वाजवण्याचं आवाहन करू शकतात. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की मोदी सरकारनं योग्य व्यवस्था न केल्यानं केवळ भारतामध्ये कोरोनासह ब्लॅक फंगस महामारी पसरली आहे. देशात लशींचा तुटवडा तर आहेच मात्र आता या नव्या महामारीच्या औषधांचाही प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशात आता याचा सामना करण्यासाठीही पंतप्रधान लवकरच टाळी-थाळी वाजवण्याचं आवाहन करतील. राहुल गांधी कोरोना संकटावरुन मोदी सरकारवर सतत टीका करताना दिसतात. शुक्रवारीच त्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी केली होती. यासोबतच देशातील लसीच्या तुटवड्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अशी विनंती केली होती, की उशीर न करता लोकांचं लसीकरण करायला हवं. देशातील अनेक राज्यांमध्ये असलेल्या लशीच्या तुटवड्याबाबतची बातमी शेअर करत त्यांनी लिहिलं, की मोदीजी लोकांचं लसीकरण लवकर करा, उशीर करू नका. दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही सवाल उपस्थित करत म्हटलं, की कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना मृतांची संख्या रोज 4000 पार का जात आहे? दररोजची रुग्णसंख्या 4 लाखावरुन घटून 2.5 लाख झाली मात्र मृतांची संख्या अजूनही 4000 पेक्षा अधिक का आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus, Narendra modi, Rahul gandhi

    पुढील बातम्या