मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

नाशिकच्या रेडिओ स्टेशननं उंचावली महाराष्ट्राची मान! 'शिक्षण सर्वांसाठी'नं जिंकले 2 अवॉर्ड

नाशिकच्या रेडिओ स्टेशननं उंचावली महाराष्ट्राची मान! 'शिक्षण सर्वांसाठी'नं जिंकले 2 अवॉर्ड

रेडिओ विश्वास असं या रेडिओ स्टेशनचं नाव आहे.

रेडिओ विश्वास असं या रेडिओ स्टेशनचं नाव आहे.

रेडिओ विश्वास असं या रेडिओ स्टेशनचं नाव आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 03 जुलै: कोरोनामुळे (Corona) शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण मागे पडलं असताना कठीण परिस्थिती विद्यार्थ्यांना रेडिओच्या (Radio) माध्यमातून शिक्षणाचे धडे देणाऱ्या नाशिकच्या एका रेडिओ स्टेशनला (Radio Station) सन्मानित करण्यात आलं आहे  आठव्या नॅशनल कम्युनिटी रेडिओ अवॉर्ड (8th edition of the National Community Radio Awards) या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Ministry of Information and Broadcasting) सुरू केलेल्या कार्यक्रमात या रेडिओ स्टेशनला त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या कार्यक्रमासाठी देण्यात आले आहेत. रेडिओ विश्वास (Radio Vishwas 90.8) असं या रेडिओ स्टेशनचं नाव आहे.

हे स्टेशन विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून चालवलं जातं. हे स्टेशन दिवसातून तब्बल चौदा तास चालवण्यात येतं. या स्टेशनच्या 'शिक्षण सर्वांसाठी' (Education for All)या तिसरी ते दहावीपर्यंतच्या शैक्षणिक कार्यक्रमाला हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. या कार्यक्रमाला सस्टेनेबिलिटी अवॉर्ड विभागात पाहिलं बक्षीस मिळालं आहे तर थिमॅटीक अवॉर्ड विभागात दुसरं बक्षीस मिळालं आहे.

हे वाचा -9 प्रयत्नांनंतर IAS झाले दृष्टीहीन बाला नागेंद्रन;डोळ्यात अंजन घालणारा प्रवास

रेडिओ स्टेशनचे संचालक डॉ. हरी विनायक कुलकर्णी म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन ऑनलाइन घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे कार्यक्रम असतात. “आमच्या स्टुडिओमध्ये150 शिक्षकांच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात आला असं  ते म्हणाले, नाशिकमधील नगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील 50,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

कुलकर्णी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सहा इतर सामुदायिक रेडिओवर हा कार्यक्रम प्रसारित केला गेला. इगतपुरी तहसीलमधील शिक्षकांच्या गटाने विद्यार्थ्यांना यूएसबी, ब्लूटूथ आणि हाय-एंड स्पीकर्ससह 145 FM डिव्हाइसेसचं वितरण केलं.

First published:

Tags: Nashik