कैमुर, 16 मे : कैमूर जिल्ह्यात लॉकडाउन पाळला जावा, यासाठी कैमूर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. विनाकारण घराबाहेर निघणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. विनाकारण...मज्जा म्हणून घराबाहेर पडलेल्यांना पोलिसांकडून चांगली शिक्षाही सुनावली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना एकदा विचार करावा. अन्यथा पोलिसांच्या नवनव्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.
भभुआमधील एकता चौकात असाच एक प्रसंग घडला आहे. टाटा मॅजिकवर अनेक जणं मोहनियाच्या दिशेने जात होते. पोलिसांना याबाबत विचारलं असता त्यांनी लग्नाचे वऱ्हाडी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र पोलिसांनी सर्वांना गाडीतून खाली उतरवलं आणि रस्त्यावर बेडूक उड्या मारायला सांगितलं. याशिवाय मास्क न घातलेल्यांचंही चालान कापलं. मिळालेल्या माहितीनुसार, भभुआ पोलीस ठाण्याचे एसआयइ रणवीर कुमार यांनी सांगितलं की, लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी सातत्याने लोकांकडे अपील केली जात आहे. मात्र तरीही अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत असताना दिसत आहे. अशा लोकांना शिक्षाही केली जात आहे. याशिवाय जे लोक विमामास्क दिसतात त्यांचं चालानदेखील कापलं जात आहे.
हे ही वाचा-कोरोनाने माणुसकी संपवलीये का? 2 दिवस 90 वर्षांच्या आजी जनावरांच्या गोठ्यात पडून
या घटनेबाबत एसआय यांचं म्हणणं आहे की, हे सर्व लोक वरातीत जाण्यासाठी एका गाडीवर बसले होते. मात्र वरातीत जाण्यासाठी केवळ 20 लोकांना परवानगी आहे. यामुळे शिक्षा देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Marriage