Home /News /coronavirus-latest-news /

'आधी संपत्ती मगच किडनी'; घरातील वाद कोविड वॉर्डापर्यंत, पती-पत्नीमध्ये महाभयंकर राडा

'आधी संपत्ती मगच किडनी'; घरातील वाद कोविड वॉर्डापर्यंत, पती-पत्नीमध्ये महाभयंकर राडा

घरातील वाद चव्हाट्यावर नाही, तर कोविड वॉर्डापर्यंत पोहोचला आहे.

    भरतपुर, 14 मे : भरतपुरमधील जिल्ह्यातील आरबीएम रुग्णालयातील कोविड-19 वॉर्डच्या आत दाखल केलेल्या रुग्णाचा त्याची पत्नीसोबत जोरदार वाद झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणत्याही पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ तीन दिवस जुना आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोता गावातील रहिवाशी रुपकिशोरची किडनी निकामी झाली असून दरम्यानच त्याला कोरोनाचीही लागण झाली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबाकडून आजारी व्यक्तीच्या पत्नीला किडनी दान करण्याची विनंती केली जात होती. पत्नीने मात्र किडणी देण्यास नकार दिला. पत्नीचं म्हणणं आहे की, जेव्हा रुपकिशोर सर्व संपत्ती तिच्या नावावर करेल तेव्हा ती किडणी देण्यास तयार होईल. हे ही वाचा-लग्नात भलतीच गर्दी, पोलीस येताच भिंतीवरुन उडी घेत नवरी-नवरदेवानं ठोकली धूम या गोष्टीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि कुटुंबीयांमध्ये भांडणं, वाद सुरू होते. यादरम्यान दोन्ही पक्षामध्ये मारहाण झाल्याचंही वृत्त समोर आलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना पंखा उचलून हल्ला केला. त्यानंतर कोविड वॉर्डातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाचे पीएमओ डॉ. जिज्ञासा साहनी यांनी सांगितलं की, वॉर्डच्या आत रुग्णाचे नातेवाईक घुसले होते. ज्यात स्टाफलादेखील मारहाण करण्यात आली. ते म्हणाले की, यात वॉर्डच्या बाहेर तैनात सुरक्षा रक्षकांचीही चूक आहे. त्यांनी कुटुंबीयांना आत येण्यास परवानगी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona patient, Kidney sell

    पुढील बातम्या