'राजकारण करणारे करोत, सध्या युद्धपातळीवर कोरोना रोखण्यासाठी पुढाकार घ्या', पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल

'राजकारण करणारे करोत, सध्या युद्धपातळीवर कोरोना रोखण्यासाठी पुढाकार घ्या', पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल

देशात 11 ते 14 एप्रिलदरम्यान 45 हून जास्त वय असलेल्यांसाठी लसीकरण उत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अवघ्या महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या 60 हजारांजवळ पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आज कोरोना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हर्चुअल बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, 11 एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यादरम्यान देशभरात लसीकरण उत्सवाचं आयोजन केलं जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे. या टीका उत्सवादरम्यान अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण केलं जावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. यावेळी मोदी म्हणाले की, मी देशातील तरुणांना आवाहन करीत आहे की, त्यांनी आपल्या जवळील व्यक्ती ज्यांचे वय 45 हून अधिक आहे, त्याचं लसीकरण करण्यासाठी मदत करावी.

महासाथीवरुन देशभरात राजकारण केलं जात आहे. देशातील लोकांची सेवा करणं आमची जबाबदारी आहे. मला यावर काहीचं बोलायची इच्छा नाही. जे राजकारण करीत आहेत, ते करीतच आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी पुढे यावं, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Published by: Meenal Gangurde
First published: April 8, 2021, 8:55 PM IST

ताज्या बातम्या