मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /School reopen | मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?

School reopen | मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु (school reopen) करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली. मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर हे नक्की वाचा.

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु (school reopen) करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली. मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर हे नक्की वाचा.

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु (school reopen) करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली. मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर हे नक्की वाचा.

मुंबई, 25 नोव्हेंबर: राज्यात कोरोना (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा (primary school reopening in maharashtra) सुरु करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आठवी ते बारावीबरोबरच प्राथमिक शाळा म्हणजेच पहिली ते सातवीच्या शाळाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आता पालकांची धाकधूक वाढली असून आपल्या मुलांना शाळेत पाठवताना काय काळजी घ्यावी असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहे. याच संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

शाळेत पाठवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?

 • शाळा सुरू होत असल्याने आता पालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. मुलांना आता स्वयंशिस्त लावणे तुमच्या हातात आहे. त्यांच्या मनातील भीती घालवून मुलांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करणे. मुलांसोबत सॅनिटायझर, पाण्याची बाटली, तोंडाला मास्क अशी पूर्वतयारी करावी.
 • घरी ज्याप्रकारे स्वच्छता पाळली जाते, त्याचप्रकारे शाळेतदेखील मुलांनी याचं पालन करण्यास सांगयला हवे.
 • शाळेतील इतरांशी जास्त जवळीक न साधता शक्यतो एकमेकांना स्पर्श करणे टाळावे. जर कोणाला सर्दी आथवा कोरोनासंबंधी लक्षणे दिसली तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांची नियमित तपासणी केल्यानंतरच शाळेत पाठवावे.
 • यासोबत शाळेत जाऊनही पालकांनी कोरोनाचे नियम पाळले जातात की नाही? याची शहानिशा करायला हवी. तसे होत नसल्यास संबंधित यंत्रणेकडे माहिती द्यावी.

 • मुलांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांना पूर्वकल्पना देणे. शाळेतून विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याला अंघोळ किंवा हातपाय धुण्यास सांगावे.
 • तसेच मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास योग्यती वैद्यकीय मदत घ्यावी.
 • शाळांनी देखील मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेतील टेबल, बेंच, लादी आणि दरवाजे साबण अथवा सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ करावेत.
 • खोकला अथवा शिंक आल्यास कशाप्रकारे काळजी घ्यावी हेदेखील मुलांना शिकवावे. खोकतांना अथवा शिंकताना तोडांसमोर रुमाल धरण्याचे महत्व मुलांना पटवून सांगवे, असा सल्ला त्यांनी दिला.
 • स्कूल बसने मुलांना पाठवण्याआधी ती व्यवस्थित सॅनिटाईझ होते का? बसण्याची व्यवस्था काय आहे? याची चौकशी करावी.
 • कोरोनाचा प्रदुर्भाव झालेल्या मुलांच्या पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी न पाठवता विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
 • मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाला प्राधान्य द्यावे. भीती दूर करण्यासाठी वेळोवेळी मुलांशी सकारात्मक संवाद साधावा. ऑनलाइन वर्गात आतापर्यंत शिकविलेल्या अभ्यासाचा आढावा घ्यावा.

Maharashtra School Reopen: अखेर राज्यातील शाळा सुरू होणार,

शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड काय म्हणाल्या?

"ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत, त्यामुळे आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार आहेत. तर शहरी भागात सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरु आहेत म्हणूनच आता शहरी भागात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शाळांनीही विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी." असं शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

First published:

Tags: School, School children, School student, Varsha gaikwad