मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लशीचा Precaution dose Free नाही; मोजावे लागतील इतके पैसे

कोरोना लशीचा Precaution dose Free नाही; मोजावे लागतील इतके पैसे

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटने (Serum Institute of India) आपल्या कोविशिल्ड लशीच्या प्रिकॉशन डोसची (Precaution dose) किंमत जारी केली आहे.

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटने (Serum Institute of India) आपल्या कोविशिल्ड लशीच्या प्रिकॉशन डोसची (Precaution dose) किंमत जारी केली आहे.

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटने (Serum Institute of India) आपल्या कोविशिल्ड लशीच्या प्रिकॉशन डोसची (Precaution dose) किंमत जारी केली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 एप्रिल : भारतात आता  18+ नागरिकांच्या कोरोना लशीच्या (Corona vaccine) बुस्टर डोसचा मार्ग मोकळा झाला आहे (Precaution Dose to be now available to 18+ population). 10 एप्रिल 2022 पासून या वयोगटातील व्यक्तींना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे (Precaution Dose). मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण कोरोना लशीचा तिसरा डोस मोफत मिळणार की पैसे द्यावे लागणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे वय 18 वर्षे आहे आणि ज्यांना कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत, ते खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये या खबरदारीच्या डोससाठी पात्र असतील. दरम्यान हा डोस या वयोगटासाठी सध्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.

हे वाचा - ना गोळ्या-औषधं, ना इंजेक्शन; आता अगदी सहज होणार मधुमेहावर उपचार, संशोधकांनी शोधली ही नवी पद्धत

पण  कोरोना लशीचा प्रिकॉशन डोस फ्री नाही आहे. तर यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत जारी केली आहे. कोविशिल्डचा बुस्टर डोस घ्यायचा असेल तर त्यासाठी 600 रुपये मोजावे लागतील.

 

कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेदरम्यान केंद्राकडून उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. याआधी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी आणि 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी कोरोना व्हॅक्सिनच्या बूस्टर डोसची मंजुरी दिली होती.

हे वाचा - Expired Beauty Products चा इतका खतरनाक परिणाम; महिलेचा चेहरा पाहूनच हादराल

आरोग्य मंत्रालयाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र लोकसंख्येला दिला जाणारा पहिला आणि दुसरा कोरोना डोस त्याचप्रमाणे आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आणि 60+ नागरिकांना देण्यात येणारा बुस्टर डोस पूर्वीप्रमाणेच दिला जाईल. अर्थात या प्रक्रियेसाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू राहील आणि त्याला गती दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus