उमेश श्रीवास्तव/मेरठ, 29 जून : पीपीई किट (PPE KIT) म्हटलं की ते डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आहे, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाव्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी पीपीई किट घालावं लागतं. मात्र उत्तर प्रदेशच्या मेरठमधील (Meerut) एका क्लिनिकमध्ये फक्त डॉक्टर आणि क्लिनिकमधील कर्मचारीच नाही तर रुग्णांनाही पीपीई किट घालणं बंधनकारक आहे.
मेरठमधील एका डॉक्टरच्या क्लिनिकची चर्चा सध्या सर्वत्र आहे. डॉक्टर स्वत: पीपीई किट घालून रुग्णावर उपचार तर करत आहेतच मात्र रुग्णांनाही पीपीई किट घालावं लागतं. पीपीई किट घातल्याशिवाय कुणालाच क्लिनिकमध्ये प्रवेश दिला जात नाही.
हे वाचा - लॉकडाऊनमध्ये मनोरुग्णांचे हाल; औषधांअभावी हातपाय बांधण्याची नामुष्की
क्लिनिकमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची नोंदणी होते. त्यानंतर त्यांना पीपीई किट दिलं जातं. हात सॅनिटाइझ करून रुग्णांना हे पीपीई किट घालावं लागतं. क्लिनिकमधील सर्व कर्मचारीही पीपीई किट घालूनच असतात.
एक रुग्णाला डॉक्टरांनी तपासल्यानंतर संपूर्ण रूम सॅनिटाइझ केली जाते. एका रुग्णानंतर दुसऱ्या रुग्णाला 15 मिनिटांनी तपासलं जातं. यादरम्यान संपूर्ण रूम सॅनिटाइझ केली जाते. फरशीदेखील स्वच्छ पुसली जाते. दुसऱ्या रुग्णाला पुन्हा नवीन पीपीई किट देऊन त्याची तपासणी केली जाते.
हे वाचा - महाराष्ट्रात का वाढवला Lockdown? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा!
डेंटिस्ट डॉक्टर राजीव आनंद यांनी सांगितलं की, "रुग्णांबाबत पूर्णपणे खबरादीर घेतली जाते आहे. क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पीपीई किट घालून येतो. उपकरणंही सॅनिटाइझ करूनच वापरली जातात आणि दिवसातील कित्येक वेळा क्लिनिकमधील हवादेखील बदलली जाते"
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.