जगातील सर्वात मोठे लस उत्पादक पूनावाला यांनी व्यक्त केली भीती; सरकारकडे केली मागणी

जगातील सर्वात मोठे लस उत्पादक पूनावाला यांनी व्यक्त केली भीती; सरकारकडे केली मागणी

परंतु जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला या यांनी एक वेगळी भीती व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : सध्या देशासह संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या लशीची (Coronavirus Vaccine) प्रतीक्षा करीत आहे. काही देशांमध्ये लसीकरण देखील सुरू झाले आहे. (vaccination against covid-19)  तर बहुतेक देशांमध्ये पुढच्या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात लस आणण्याची तयारी सुरू आहे. परंतु जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला या यांनी एक वेगळी भीती व्यक्त केली आहे.

लशीच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल लस कंपन्यांविरूद्ध खटला भरण्याची भीती पूनावाला यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लस उत्पादकांना अशा प्रकारच्या खटल्यापासून बचाव करण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन लस बनवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, लस निर्मितीसंदर्भातील आव्हानांवरीस वर्च्युअल पॅनेलच्या चर्चेत पूनावाला यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले की, त्यांच्या कंपनीकडून सरकारकडे हा प्रस्ताव ठेवण्याचा विचार सुरू आहे. पूनावाला पुढे म्हणाले की, लस उत्पादकांना सर्व प्रकारच्या खटल्यांपासून संरक्षण देणे आवश्यक आहे. खटल्याची भरपाईसाठी सरकारने उत्पादकांना मदत करावी. COVAX आणि इतर देशांमध्ये यापूर्वीच यासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या आहेत. अदार पूनावाला यांनी सांगितलं की, 'लस ​​उत्पादकांनी साथीच्या रोगाचा बचाव करण्यासाठी लक्ष द्यायला हवं.' ते म्हणाले की या लसीचे काही दुष्परिणाम असल्याचा दावा आणि त्यादृष्टीने गुन्हा दाखल केला केला तर लोक लस घेण्याची भीती बाळगतील.

हे वाचा-...आणि कोरोनाची लस घेताच काही मिनीटात ती पडली बेशुद्ध, VIDEO VIRAL

पूनावाला यांनी सांगितलं की, सरकारला एका कायद्याची आखणी करायला हवी. यातून कंपन्या लस तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करतील. अन्यथा ते कायदेशी बाबींमध्ये अडकतील. त्यांनी यावेळी अमेरिकेतील एक उदाहरण दिलं, ज्यामध्ये महासाथीदरम्यान लस निर्मिती कंपन्यांना गंभीर दुष्परिणामांबाबत कायदेशीर बाबींपासून सुरक्षा देण्यात आली आहे. ते म्हणाले की, कायदेशीर बाबींमधून लस निर्माते दिवाळखोर होतील. त्यामुळे दिवसभर कायदेशीर बाबी आणि मीडियाला उत्तर देण्यातच वेळ जाईल.

काही दिवसांपूर्वी, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लस कोविशिल्डच्या क्लिनिकल चाचणीत भाग घेणार्‍या एका प्रतिनिधीने संस्थेवर 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. लस दिल्यानंतर त्याचे गंभीर न्यूरोलॉजिकल साइड इफेक्ट्स असल्याचा त्याने दावा केला. सीरम इन्स्टिट्यूटने हे आरोप फेटाळून लावले आणि स्वयंसेवकांवर खटला चालविण्याची धमकी दिली. त्या घटनेनंतर पूनावाला यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 20, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या