लसीकरणासाठी पोलीस कॉन्स्टेबलने वृद्ध महिलेला उचललं हातात; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

लसीकरणासाठी पोलीस कॉन्स्टेबलने वृद्ध महिलेला उचललं हातात; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

लशीकरिता नागरिकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात दिव्यांग, वयोवृध्द नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे: सध्या देशभरात कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरण अभियान (Vaccination Campaign) सुरु आहे. परंतु, लशीकरिता नागरिकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात दिव्यांग, वयोवृध्द नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक सुखद चित्र दिसून आले. एका वयोवृध्द महिलेला लसीकरणासाठी पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) स्वतः उचलून केंद्रावर नेले आणि परत घरी आणून सोडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने एका वयस्कर महिलेला आपल्या हातात उचलून घेत, लसीकरणासाठी घेऊन जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण भयग्रस्त आहेत. अशा स्थितीत या कॉन्स्टेबलचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. जलदगतीने म्युटेट (Mutate) होणाऱ्या कोरोनाच्या विषाणूवर प्रभावी संशोधनासाठी वैज्ञानिकांचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. त्यात सध्या तरी लस हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही स्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाने नुकतीच 18 वर्षांवरील सर्व व्यक्तीचे लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. अशा वेळी दिल्ली पोलिसांतील काही चांगल्या व्यक्तींनी जे वृध्द किंवा असुरक्षित घटक आहेत,त्यांच्या लसीकरणासाठी आणित्यांना महत्वाची संसाधने उपलबध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लस देण्यासाठी एका वयोवृध्द महिलेला स्वतः हातात उचलून घेऊन जाणाऱ्या कॉन्स्टेबलचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा-पुण्यात म्युकरमायकोसीसच्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार,कुलदीप सिंग (Kulddep Singh) असे या पोलीस कॉन्स्टेबल चे नाव असून ते ज्या महिलेला लसीकरणासाठी घेऊन जात आहेत,त्या महिलेचे नाव शैला डिसूझा (Shaila D Souza) आहे. या वृध्द महिलेला पीपीई किट (PPE Kit) घालून तिला आपल्या हातात उचलून बिल्डींगच्या पायऱ्या उतरत लसीकरणासाठी कुलदिप सिंग हे केंद्रावर घेऊन जात असल्याचे या फोटोमध्ये दिसते. हे फोटो सोशल मिडीयावर शेअर झाल्यापासून नेटिझन्स असा उदात्त भाव जपणाऱ्या कुलदीप सिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

शैला डिसूझा यांचे वय 82 वर्षे असून,त्या निवृत्त शिक्षिका आहेत. एका मदतनीसासोबत त्या राहतात. त्यांची ही स्थिती पाहून कुलदीप यांनी केवळ लसीकरण केंद्रावरच नेले नाही तर लसीसाठीची ऑनलाईन प्रोसेस देखील करुन दिली. काश्मिर गेट पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ते तैनात असलेल्या भागामध्ये अनेक जेष्ठ नागरिक आहेत,त्यामुळे या सर्व नागरिकांसह शैला डिसूझा यांच्याकडेही आमचे लक्ष आहे. शैला या गेल्या 2 वर्षांपासून पायी चालू शकत नाहीत.

व्हायरल फोटोबाबत (Viral Photos) बोलताना कुलदीप सिंग म्हणाले,की शैला डिसूझा ज्या भागात राहतात,तेथे व्हिलचेअर किंवा स्ट्रेचर पोहचू शकत नाही. ही स्थिती पाहता मी त्यांना माझ्या हातावर उचलत लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन गेलो.

First published: May 19, 2021, 7:52 AM IST

ताज्या बातम्या