मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना रुग्णांसाठी पोलिसांनी हाती घेतला स्टेथेस्कोप; निभावतायेत डॉक्टरचीही जबाबदारी

कोरोना रुग्णांसाठी पोलिसांनी हाती घेतला स्टेथेस्कोप; निभावतायेत डॉक्टरचीही जबाबदारी

कोरोना योद्धे तर जिवाचं रान करून लढत आहेत. त्यातच गुजरातमध्ये (Gujarat) आता काही पोलिस अधिकारी (IPS) डॉक्टरच्या भूमिकेतूनही आपलं कर्तव्य बजावत आहेत.

कोरोना योद्धे तर जिवाचं रान करून लढत आहेत. त्यातच गुजरातमध्ये (Gujarat) आता काही पोलिस अधिकारी (IPS) डॉक्टरच्या भूमिकेतूनही आपलं कर्तव्य बजावत आहेत.

कोरोना योद्धे तर जिवाचं रान करून लढत आहेत. त्यातच गुजरातमध्ये (Gujarat) आता काही पोलिस अधिकारी (IPS) डॉक्टरच्या भूमिकेतूनही आपलं कर्तव्य बजावत आहेत.

मुंबई 13 मे: कोरोना (Corona Pandemic) काळात जणू आभाळच फाटलंय,त्यामुळे ठिगळ तरीकिती ठिकाणी आणि कोण लावणार,असा प्रश्न आहे. तरीही अनेक हात मदतीसाठी पुढेयेत आहेत. कोरोना योद्धे तर जिवाचं रान करून लढत आहेत. त्यातच गुजरातमध्ये (Gujarat) आता काही पोलिस अधिकारी (IPS) डॉक्टरच्या भूमिकेतूनही आपलं कर्तव्य बजावत आहेत.

गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आता डॉक्टर्सच्या संख्येची कमतरता जाणवते आहे. त्यावर गुजरात पोलिसांनी एकउपाय काढला आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी वैद्यकीय क्षेत्राची (Medical Field) आहे,अशा18जणांकडे पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांमधल्याकोरोनाग्रस्तांना वैद्यकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मेहसाणाजिल्ह्यात सेवा देणारे डॉ. पार्थ राज (Dr. Parth Raj) हे गोहिल जिल्ह्याचेपोलिस अधीक्षक आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच डॉ. पार्थपोलिस परिवारातल्या कोरोना संसर्गग्रस्तांच्या उपचारांमध्येही योगदान करतआहेत. डॉ. पार्थ हे आयपीएस अधिकारी बनण्याआधी डॉक्टर होते. त्यांच्याकडेअसलेलं वैद्यकीय ज्ञान आता लोकांच्या उपयोगी पडत आहे.

नदीत तरंगणारे मृतदेह भीतीदायक! काय पाण्याच्या माध्यमातून पसरतो कोरोना? वाचा सविस्तर

वलसाडजिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. राजदीप झाला (Dr. Rajdeep Jhala) हेदेखीलपोलिस परिवारातल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. पोलिस कॉलनी,तसंच कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये डॉ. राजदीप झाला रुग्णांना औषधाचे डोसेसवगैरेंची माहिती देतात. कोविड हॉस्पिटलमध्ये दररोज जाणं,आपल्यासोबत नेहमीकाम करणाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणं हा आता नित्यक्रम बनला आहे,असंडॉ. राजदीप झाला सांगतात. डॉ. राजदीप सांगतात,की पोलिस परिवारात जेव्हाजिल्ह्याचा प्रमुख दस्तुरखुद्द त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असतो तेव्हारुग्णांचं मनोबल आणखी वाढतं.

बडोद्याचे पोलिस उपायुक्त डॉ.करणवाघेलाही (Dr. Karan Waghela) आयपीएस बनण्याआधी डॉक्टर होते. त्यामुळेकोरोनाच्या या काळात एसआरपी परिवारांची वैद्यकीय काळजी घेण्याची जबाबदारीडॉ. वाघेला यांच्यावर आली आहे. वैद्यकीय बाबतींत कोणत्या वेळी काय करायचंया माहितीसाठी पोलिस कर्मचारी आता डॉ. वाघेलांना फोन करतात.

कोरोनाकाळात पोलिस आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर (Frontline Workers) म्हणून कामकरत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. अनेक पोलिसांचे त्यात प्राणगेले. तरीही आपल्या ड्युटीलाच त्यांनी प्राधान्य दिलं. त्यातच आतागुजरातमध्ये डॉक्टर्सची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय ज्ञानअसलेल्या पोलिसांनी आता तिथेही आपलं कर्तव्य बजावायला सुरुवात केली आहे.दोन ते तीन जिल्ह्यांतल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीयदृष्ट्या जबाबदारी पोलिस अधिकारी सांभाळत आहेत.

First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus cases