नवी दिल्ली, 21 मे: सध्या आपला देश कोरोना (Coronavirus) सारख्या महाकाय संकटाशी दोन हात करत आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. तरी देखील फ्रंटलाइन वर्कर्स (Front-Line Workers) या संकटाशी निकराने लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अशा काही फ्रंटलाइन वर्कर्सशी आज संवाद साधला. वाराणसीतील डॉक्टरांशी त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीबाबत डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी असं म्हटलं की, कोरोनाविरोधातील या लढाईत आपण अनेकांना गमावलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संबोधित करताना असं म्हटलं की, काशीचा सेवक या नात्याने मी सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. या विषाणूने अनेकांना आपल्यापासून हिरावून घेतेले आहे, मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो, असं यावेळी पंतप्रधान म्हणाले.
Prime Minister Narendra Modi interacts with doctors, paramedical staff and other frontline health workers of Varanasi, Uttar Pradesh pic.twitter.com/EPPaAtWnGO
— ANI (@ANI) May 21, 2021
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॅक फंगस हे नवं आव्हान असल्याचं देखील म्हटलं आहे. ब्लॅक फंगसशी सामना करण्यासाठी तयारी करण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचा आवाहन पंतप्रधांनांनी केलं आहे.
कोरोना लशीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की, लशीमुळे आपल्या फ्रंटलाइन वर्कर्सना संरक्षण मिळाले आहे, जे देशातील नागरिकांची सेवा करत आहेत. येणाऱ्या दिवसात लशीचे संरक्षण सर्वांना उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे की लस ही सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की, आपली लढाई एका अदृश्य, धूर्त अशा रुप बदलणाऱ्या दुश्मनाशी आहे. अशावेळी आपण सतर्क राहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की यातून लहान मुलांना वाचवणे आवश्यक आहे आणि त्याकरता योग्य पावलं उचलणंही गरजेचं आहे.
Reviewing COVID-19 situation in Kashi with doctors and frontline workers working there. https://t.co/eIg562g009
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की वाराणसीतील कोरोना नियंत्रणात आणण्यास आपण यशस्वी झालो आहोत. मात्र आता फोकस वाराणसी आणि पूर्वांचलमधील ग्रामीण भागावर आहे. आज वाराणसीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 100 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला होका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.