Corona रुग्णांसाठी प्रभावी नाही प्लाझ्मा थेरपी, उपचाराच्या पद्धतीतून हटवणार सरकार!

Corona रुग्णांसाठी प्रभावी नाही प्लाझ्मा थेरपी, उपचाराच्या पद्धतीतून हटवणार सरकार!

प्लाझ्मा थेरपीविषयी (Plasma Therapy) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) टास्क फोर्सने चर्चा केली. टास्क फोर्सचे सर्व सदस्यांचं असंच म्हणणं होतं, की कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी आढळलेली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 16 मे : देशभरात हाहाकार घातलेल्या कोरोना (Coronavirus) महामारीच्या इलाजासाठी प्लाझमा थेरपी प्रभावी असल्याचं आढळलेलं नाही. अशात सरकार लवकरच प्लाझमा थेरपी उपचाराच्या पद्धतींच्या सूचीमधून हटवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. सूत्रांनी सांगितले, की प्लाझ्मा थेरपीविषयी (Plasma Therapy) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) टास्क फोर्सने चर्चा केली. टास्क फोर्सचे सर्व सदस्यांचं असंच म्हणणं होतं, की कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी आढळलेली नाही. म्हणूनच, उपचाराच्या पद्धतीच्या यादीतून ते काढून टाकायला पाहिजे.

बर्‍याच सदस्यांनी सांगितलं, की या थेरपीचा अयोग्य वापर काही ठिकाणी आढळून आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीएमआर लवकरच यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. अनेक डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना पत्र लिहित देशात कोरोनावरील उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग होत असल्याबद्दल सावध केलं आहे. यानंतरच प्लाझमा थेरपी उपचारांच्या यादीतून हटवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांनी असे म्हटले आहे, की कोरोनावरील उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपी उपयोगी असल्याचा काहीही पुरावा नाही.

सध्याच्या उपचाराच्या पद्धतींनुसार, रुग्णात कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर सात दिवसांच्या आत या थेरपीचा वापर करता येतो. याअंतर्गत, कोरोनापासून बरे झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान केले आहे, करतात. हा प्लाझ्मा तपासणीनंतर कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो.

Published by: Kiran Pharate
First published: May 16, 2021, 7:38 AM IST

ताज्या बातम्या