मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

प्लाझ्मा थेरेपीचा भारतीय रुग्णांना कसा आणि किती फायदा झाला? जाणून घ्या

प्लाझ्मा थेरेपीचा भारतीय रुग्णांना कसा आणि किती फायदा झाला? जाणून घ्या

कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा थेरेपीचा आजाराचं गांभीर्य कमी होण्याची किंवा मृत्यूच्या कारणाशी तसा काही संबंध नाही.

कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा थेरेपीचा आजाराचं गांभीर्य कमी होण्याची किंवा मृत्यूच्या कारणाशी तसा काही संबंध नाही.

कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा थेरेपीचा आजाराचं गांभीर्य कमी होण्याची किंवा मृत्यूच्या कारणाशी तसा काही संबंध नाही.

मुंबई, 27 ऑक्टोबर : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त ठरत आहे असं आपण गेले अनेक दिवस ऐकत आहोत. पण आता भारतातील काही संशोधकांनी केलेल्या संशोधनानंतर असं लक्षात आलं आहे की कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा थेरेपी सामान्य लक्षणं असलेल्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची लक्षणं कमी करू शकते पण त्याचा आजार गंभीर होण्यापासून किंवा मृत्यूपासून त्याचा बचाव करू शकत नाही. म्हणजेच प्लाझ्मा थेरेपी रुग्णांना उपयुक्त आहे पण तिचा मर्यादित उपयोग आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि तमिळनाडूतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिऑलॉजीच्या संशोधकांनी मिळून एप्रिल ते जुलै या काळात देशातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या 18 वर्षांहून अधिक वयाच्या कोविड-19 ची सामान्य लक्षणं असणाऱ्या 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा अभ्यास केला. हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित झालं आहे. कोविड-19 आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात त्या आजाराशी लढण्याची शक्ती निर्माण होते. त्याच्या रक्तातील प्लाझ्मा सेल दुसऱ्या कोविड रुग्णाला दिल्या जातात याला प्लाझ्मा थेरेपी म्हणतात. या संशोधनात 239 रुग्णांना 24 तासांच्या अंतराने दोनदा 200 ml कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा देण्यात आला आणि इतर सामान्य उपचार केले गेले. तसंच 229 जणांवर फक्त सामान्य उपचार करण्यात आले. एका महिन्याने ज्यांना प्लाझ्मा दिला होता त्यापैकी 44 रुग्णांचा आजार गंभीर झाला किंवा काही कारणांनी त्यंचा मृत्यू झाला, प्लाझ्मा न दिलेल्या गटात हे प्रमाण 41 रुग्ण इतकं होतं. हे वाचा-सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार; आता हे आहे कारण कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा थेरेपीचा आजाराचं गांभीर्य कमी होण्याची किंवा मृत्यूच्या कारणाशी तसा काही संबंध नाही. आम्ही केलेली ट्रायल ही खूप छोट्या प्रमाणावर करण्यात आली होती त्यामुळे त्याचा परिणाम काही प्रमाणात समोर आला आहे. दात्याकडून घेतलेल्या प्लाझ्मा सेल्स आणि ट्रायलमधील रुग्णांच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडिज यांच्या प्रमाणाचा अभ्यास केल्यास प्लाझ्मा थेरेपीचा कोविड-19 च्या उपचारांत किती फायदा होतो हे शोधता येईल, असं संशोधकांचं मत आहे. SARS-CoV-2 RNA ची लागण झालेल्या रुग्णाला धाप लागणं, डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत प्लाझ्मा थेरेपी दिल्यास ही लक्षणं कमी होऊ शकतात. पण प्लाझ्मा थेरेपीचा हा मर्यादित उपयोग असल्याचं नव्या छोट्या ट्रायलमधून स्पष्ट झालं आहे, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
First published:

पुढील बातम्या