पावसाळ्यात गोव्याला जायचा प्लान करताय? आधी जाणून घ्या कसा मिळेल प्रवेश, काय आहे नियमावली

पावसाळ्यात गोव्याला जायचा प्लान करताय? आधी जाणून घ्या कसा मिळेल प्रवेश, काय आहे नियमावली

पर्यटनासाठी गेलात तरी कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

  • Share this:

पणजी, 12 जून : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान काही राज्यांनी लॉकडाउनचे नियम शिथिल केले आहेत. दरम्यान, गोव्यात आयसीएमआरने प्रवाशांच्या प्रवेशासंदर्भात कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना परवानगी दिली आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार कोविड टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. आरटी-पीसीआर, सीबीएनएएटी, रॅपिड एन्टीजन टेस्ट कोणत्याही टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. सांगितलं जात आहे की, गोव्यात प्रवेश करण्याच्या 72 तासांपूर्वी केलेल्या टेस्ट रिपोर्टसह व्यक्तीला प्रवेशास परवानही दिली जाईल. हायकोर्टात याबाबत याचिका करण्यात आली आहे. ज्यानंतर राज्य प्रशासन अधिकतर 72 तासांपूर्वी केलेली कोविड निगेटिव्ह चाचणीचा रिपोर्य पाहिल्यानंतर कोणालाही प्रवेश करून देणार याबाबत निश्चिती होईल.

कोरोना नियम पाळण्यासाठी कठोर आदेश

गोव्यात कोविड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 जून रोजी सकाळी 7 पर्यंत राज्यस्तरीय कर्फ्यू वाढविला आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी निर्धारित वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले की, सोबतच घरे व इमारतींची दुरुस्ती, पावसाळा किंवा पावसाच्या संरक्षणाची तयारी आणि आदी संबंधित वस्तूंशी दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.

हे ही वाचा-विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांची 'हजामत'; पाहायला उसळली ही गर्दी...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, राज्यात जारी कर्फ्यू वाढविणे वा त्यात बदल करण्यापूर्वी राज्यात कोविड स्थितीचा आढावा करण्यात येईल. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जर कर्फ्यू हटविण्यात आला तरी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जर तिसरी लाट आली तर हीच स्थिती पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे लोकांनी आपली काळजी घ्यायला हवी. लसीकरण झाल्यानंतरही मास्क लावाव. 100 टक्के मास्क लावणे गरजेचं आहे. गोव्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 472 नवीन रुग्ण समोर आले आहे. यादरम्.ान 601 जणं डिस्चार्ज झाले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या गोव्यात एकूण 5057 सक्रिय रुग्ण आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: June 12, 2021, 9:41 PM IST

ताज्या बातम्या