जिनिव्हा, 22 जानेवारी : जगातील काही देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. जगात सर्वात आधी मंजुरी मिळालेल्या Pfizer च्या कोरोना लशीचे (Coronavirus Vaccine) अनेक दुष्परिणाम समोर आले. ही लस घेतल्यानंतर अनेकांचा मृत्यूही झाला. पण तरी ही लस सुरक्षित आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे.
अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांनी एकत्रित तयार केलेली ही लस आहे. या लशीला सर्वात आधी ब्रिटन, त्यानंतर अमेरिका आणि इतर देशांमध्येही आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. नॉर्वेमध्ये Pfizer ची कोरोना लस घेतलेल्या 23 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर लशीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.
हे वाचा - 'सिरम'मध्ये अपघात की घातपात, ते चौकशीतून कळेल - मुख्यमंत्री
दरम्यान कोरोना लशीची सुरक्षितता पडताळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं समिती नेमली होती या समितीनं लशीच्या सुरक्षिततेची शाश्वती दिली आहे. फायझरची कोरोना लस वयस्कर व्यक्तींसाठी सुरक्षित आहे, असं समितीनं स्पष्ट केलं आहे.
फायझरच्या कोरोना लशीचे अनेक दुष्परिणाम दिसून आले आहेत. बहुतेकांना त्वचेचं इन्फेक्शन झालं आहे. काही जणांना अशक्तपणा आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, एका आरोग्य कर्मचाऱ्याला तर लकवाही मारला. लस घेतल्यानंतर काही तासांतच कित्येकांनी आपला जीव गमावला आहे. पण तरी ही लस सुरक्षित आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
हे वाचा - अवैध लशीचा भयंकर दुष्परिणाम! कोरोनानंतर आणखी एका आजाराचं संकट
शिवाय फायझर आणि बायोएनटेकची ही लस लवकरच COVAX मार्फत विकसनशील आणि गरीब देशांनादेखील मिळणार आहे. WHO आणि GAVI या लस संस्थेनं कोरोना लशीसाठी उपलब्ध केलेलं COVAX हे माध्यम आहे. जगभरात जे देश कोरोना लस तयार करत आहेत, त्या देशांना कोवॅक्सच्या माध्यमातून गरीब देशांनाही लशीचा पुरवठा करता येणार आहे. फायझर आणि बायोएनटेकदेखील यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, असं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. पण याबाबत दोन्ही लस उत्पादक कंपनी, WHO, GAVI यांच्याकडून अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus