Home /News /coronavirus-latest-news /

Covid 19 Pfizer-BioNTech vaccine : भारतात आपात्कालीन वापरासाठी मागितली परवानगी

Covid 19 Pfizer-BioNTech vaccine : भारतात आपात्कालीन वापरासाठी मागितली परवानगी

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

रशिया आणि ब्रिटनमध्ये नागरिकांना कोरोनाची लस दिली जात असताना आता भारतातही कोरोनाच्या लशीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : रशिया आणि ब्रिटनमध्ये नागरिकांना कोरोनाची लस दिली जात असताना आता भारतातही कोरोनाच्या लशीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. औषध निर्माण करणाऱ्या pfizer कंपनीने विकसित केलेली कोरोनाची लस आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी DCGI कडे परवानगी मागितली आहे. कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरण्यासाठी मंजुरी द्यावी असा अर्ज कंपनीकडून करण्यात आला आहे. या लशीला ब्रिटेन आणि बहरीनमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर आता भारतातही ही परवानगी मागण्यात आली आहे. औषध नियामकांकडे दाखल केलेल्या अर्जात कंपनीने भारतात आयात आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ड्रग्स अॅण्ड क्लिनिकल ट्रायल नियम 2019 च्या विशेष तरतुदीनुसार भारतातील लोकसंख्येचा विचार करता क्लिनिकल चाचण्यांमधून सूट मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला असून त्यासाठी मान्यता मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाव्हायरसविरूद्ध 95 टक्के प्रभावी असलेली फायझर कंपनी आणि बायोएनटेक एसई कंपनीच्या कोरोना लशीला यूकेमध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासूनच ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस synthetic mRNA वर आधारित आहे. याद्वारे मानवी शरीरात प्रोटीन तयार होतात जे नंतर संरक्षणात्मक अँटिबॉडी विकसित करतात. हे वाचा-पुणेकर ठरला Asian Of the Year; कोरोना विरोधी कामगिरीबद्दल पुनावालांचा सन्मान अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे. ब्रिटनमधून जगाला दिलासा देणारी बातमी आल्यानंतर काही तासांनी पुतीन यांनी रशियन सरकारला मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आदेश दिल्याने आता 2020 च्या अखेरीस जगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या