कोलकाता 25 एप्रिल: देशभरात कोरोनानं (Coronavirus in India) अक्षरशः थैमान घातलेलं असताना आरोग्य सुविधांची मोठी कमतरता जाणवत आहे. यामुळे, रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता एका रुग्णालयातून थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. कोरोना चाचणी (COVID-19 Test) करण्यासाठी आलेले लोक स्वतःच आपलं स्वॅब सॅम्पल घेऊन जमा करत असल्याचं चित्र पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जांगीपुर येथील सरकारी रुग्णालयात पाहायला मिळालं आहे. यादरम्यान रुग्णालयात कोणीही स्टाफ उपस्थित नसल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार याप्रकरणी जांगीपुर रुग्णालयाला उत्तर मागण्यात आलं आहे.
ही चाचणी कशी केली जाते, याबद्दलची माहिती नसतानाही अनेक लोक स्वतःच्याच गळ्यातून स्वॅब घेत होते आणि ते एका ट्यूबमध्ये ठेवत होते. या पूर्ण प्रकियेदरम्यान रुग्णालयात केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. तो चाचणीसाठी आलेल्या लोकांची माहिती लिहून घेत होता.
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं कोविड रुग्णालयाला भीषण आग, 15 जणांचा मृत्यू
एका महिलेनं सांगितलं, की मी माझं स्वॅब सॅम्पल स्वतःच घेतलं. हे अत्यंत कठीण काम होतं, मात्र तीन ते चार वेळा प्रयत्न केल्यानंतर मी हे करू शकले. तरीही मला हे माहिती नाही की मी हे स्वॅब सॅम्पल व्यवस्थित जमा केले आहेत की नाही. मी सॅम्पल तिथे ठेवले आहेत. महिलेनं सांगितलं, की त्यांच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यादेखील कोरोना चाचणी करण्यासाठी आल्या होत्या.
आरोग्य विभागानं जारी केलेल्या बुलेटीननुसार, बंगालमध्ये शनिवारी एका दिवसात 14,281 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या वाढून 7,28,061 वर पोहोचली आहे. तर, शनिवारी झालेल्या 59 रुग्णांच्या मृतांचा आकडा 10,884 वर पोहोचला आहे. राज्यात मागील चोवीस तासात 7,584 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, सध्या 81,375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.