तुम्ही मास्क घालत नाही? मग कोरोनासोबत 'या' आजारालाही आमंत्रण देत आहात !

तुम्ही मास्क घालत नाही? मग कोरोनासोबत 'या' आजारालाही आमंत्रण देत आहात !

कोरोना (Corona) काळात मास्कचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा लोकं मास्कचा वापर करणं टाळतात. त्यामुळे कोरोनाचा धोका तर वाढतोच पण इतर अनेक गंभीर आजारांचा धोकाही निर्माण होतो.

  • Share this:

दिल्ली, 21 ऑक्टोबर: दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास देखील अडचण होते. त्यामुळे या ठिकाणी केवळ कोरोनापासून वाचण्यासाठी नव्हे तर प्रदूषणापासून वाचण्यासाठी देखील मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

याविषयी माहिती देताना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलधील रेस्पिरेटरी विभागातील अधिकारी डॉ. नीरज कुमार गुप्‍ता यांनी म्हटले, कोरोनाबरोबरच आता प्रदूषणापासून वाचण्यासाठी देखील मास्क घालणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांच्या आरोग्यावर याचा दुप्पट परिणाम होऊ शकतो. प्रदूषणामुळे आपल्या श्वसननलिकेतील  प्रतिरोधक क्षमता कमी होते. त्याचबरोबर काहीवेळा यामध्ये सूज येण्याबरोबरच कोरोना होण्याचा धोका देखील वाढू शकतो. प्रदूषणामध्ये व्यक्तीला कोरोना झाल्यास त्याला याचा मोठा फटका बसणार असल्याचे देखील गुप्ता म्हणाले. प्रदूषणामुळे कोरोना झाल्यास तुमच्या फुफ्फुसांवर देखील याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मास्क घातला नाहीतर याचे संक्रमण वेगाने वाढू शकते.  त्यामुळे हे पार्टिकुलेट मॅटर म्हणजे धुळीचे सूक्ष्म कण कोरोना होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

याचबरोबर याविषयी बोलताना डॉ. नीरज यांनी म्हटलं, इटलीमध्ये हे दिसून आलं आहे. ज्याठिकाणी प्रदूषण जास्त आहे त्याठिकाणी कोरोनामुळे जास्त मृत्यू होत आहेत. त्यामुळे प्रदूषणाबरोबरच कोरोना झाल्यास व्यक्तीला मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटलं.

ट्रिपल लेयर मास्‍क घालणे सर्वात सोईस्कर

दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यापासून संरक्षण करण्यासाठी N- 95 मास्‍क खूप उपयोगी आहे. हे पार्टिकुलेट मॅटर रोखण्यासाठी हे N-95 मास्‍क खूप उपयोगी आहे. परंतु हे मास्क सर्वांना वापरणे शक्य नाही. या मास्कमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. पण सर्वांसाठी कपड्यापासून तयार केलेले ट्रिपल लेयर मास्‍क घालणं सर्वात सोईस्कर असल्याचे देखील समोर आले आहे.

सरकारने निश्चित केल्या मास्कच्या किमती

सरकारने दोन स्तरांच्या मास्कची किंमत 8 रुपये आणि तीन स्तरांच्या मास्कची किंमत 10 रुपये ठरवली आहे. त्यापेक्षा महाग किमतीला मास्क विकायला बंदी आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबई आणि महाराष्ट्रतही अनेक ठिकाणी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा करणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा गंभीर आजारांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 22, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या