मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना महामारीत खोट्या माहितीचा महापूर; सावधान ! असे पसरतात गैरसमज

कोरोना महामारीत खोट्या माहितीचा महापूर; सावधान ! असे पसरतात गैरसमज

कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कोरोना (Corona) महामारीसोबतच अजून एक संकट जगावर घोंगावत आहे. ते संकट आहे अफवाचं. कोरोनाबाबत सोशल मीडियावरुन किंवा लोकांच्या आपआपसातील संवादामधून अनेक अफवा पसरत आहेत. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई 15, ऑक्टोबर: माध्यमांच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या सामान्य माणसापर्यंत विविध प्रकारची माहिती लवकर पोहोचते. अनेक देशांतील संशोधनं, विविध घटना बातम्यांमुळे लोकांना माहिती उपलब्ध होत आहे. त्याचा लोकांच्या विचार सरणीवर परिणाम होत आहे. काही देशांतील एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणू महामारी हे चीनचं कारस्थान वाटत असून ते लसीकरण टाळण्याचा विचार करत आहेत.असं शास्रज्ञांनी सांगितलं. त्यामुळे केवळ लस विकसित करणं कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसं नाही असं या शास्रज्ञांचं मत आहे. ब्रिटन आणि नेदरलँडमधील संशोधकांनी यूके,अमेरिका, आयर्लंड,मेक्सिको आणि स्पेन अशा अनेक देशांमध्ये सर्वेक्षण केलं यानंतर त्यांना असं आढळलं की बहुतांश लोकांनी कोविड-19 हा कट असल्याची थिअरी खोटी असल्याचं म्हटलं. पण अशा काही थिअरी समाजातील विशिष्ट गटांतूनच पुढे आल्या आहेत, असंही लक्षात आलं. या महामारीसोबतच माहितीचा एक महापूर आला आहे त्यामुळे लोकांना खरी माहिती शोधणं कठीण झालं आहे. असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) दिला आहे. काही खोट्या थिअरींबद्दल लोक काय म्हणतात पाहूया. 1. चीनमधील वुहान शहरात प्रयोगशाळेत कोरोना विषाणू  हेतूपुरस्सर तयार करण्यात आला. वुहानमध्येच कोरोनाची महामारी सुरू होऊन जगभर पसरली. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांपैकी युके आणि अमेरिकेतील 22 ते 23 टक्के लोकांना ही थिअरी विश्वासार्ह वाटली तर  स्पेनमध्ये हे प्रमाण 37 टक्के आहे. 2. ब्रिटनमध्ये एक अफवा सुरुवातीला पसरली होती की 5G नेटवर्कच्या टॉवरमुळे कोरोनाचा विषाणू पसरत आहे. म्हणून लोकांनी हे टॉवरही जाळले होते. तर या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी मेक्सिको आणि स्पेनमधील 16 टक्के तर यूके आणि अमेरिकेतील 12 टक्के लोकांचा 5G मुळे कोरोना वाढत आहे या थिअरीवर विश्वास बसला. इन्फोडेमिक - माहितीचा महापूर संशोधकांनी एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये स्पेन, अमेरिकेतील लोक सहभागी झाले होते. कोरोना विषाणूबद्दलच्या या थिअरींच्या विश्वासार्हतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं विचारल्यावर सरासरी एक सप्तमांश लोकांना ही खोटी माहिती खरी वाटायला लागली. दुसऱ्या बाजूला या सर्वेक्षणातील लोकांपैकी एक सप्तमांश लोकांना शास्रज्ञ शोधून काढतील त्या लशीवर विश्वास वाटत असून ते लसीकरण करून घेतील ही शक्यता 73 टक्क्यांनी वाढली आहे. लोकांचा कोरोनाबाबतच्या माहितीसाठी विविध देशांतील राजकारण्यांवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीलाही महत्त्व आहे. अफवा पसरवण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असून त्यांनी सुरूवातीपासून अफवा पसरवल्या आहेत. या संपूर्ण स्थितीत जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आकडेवारी कळते आहे. अफवा आणि संशोधनं दोन्हीही लोकांपर्यंत पोहोचत आहेत पण कशावर विश्वास ठेवायचा अशा संभ्रमात लोकं असतात. अशावेळी ते राजकारण्यांवर विश्वास ठेवतात. अतिमाहितीमुळेही धोका निर्माण होऊन लोक अफवेच्या आधारावर लसीकरण करणं नाकारू शकतात असंही शास्रज्ञांचं मत आहे. त्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Social media

पुढील बातम्या