रत्नागिरी, 14 जून : रत्नागिरीत राहणाऱ्या एका 14 वर्षांचा मुलीचा डोळा काढण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. सानिका लिंगायत ही रत्नागिरीच्या भावे आडोम्ब या गावात राहणारी. तिच्या डोळ्याखाली सूज आली हे निमित्त झालं आणि त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं. एक साधी मुंगी चावली असेल तर ड्रॉप देऊन डॉक्टर तिला बरे करतील असं या कुटुंबाला वाटलं. पण प्रत्यक्षात तिला काय झालं हे कळायला 3 आठवडे लागले. तेदेखील मुंबईतील डॉक्टरांनी सांगिततल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
तोपर्यंत सानिकासाठीर डॉक्टरने जे जे सांगितलं ते सगळं केलं. या तीन आठवड्यात तिचा डोळा सुजून पूर्ण बाहेर आला होता आणि दृष्टी कायमची गेली होती. दुसरा डोळा आणि आयुष्य वाचवण्यासाठी कूपरमधील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करत एक डोळा काढून टाकला. तिला कधीच कोरोना झाला नव्हता असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. पण तिच्या अँटीबॉडीजच्या चाचणीत तिला कोविड होऊन गेला हे स्पष्ट झालं.
पण तिला कोणतीही औषधं दिली गेली नव्हती आणि तरीही तिला म्युकर मायकोसिस झाला. त्यामुळे रेमेडिसीविर किंवा ऑक्सिजन थेरपी दिलेल्यांना किंवा डायबेटीसच्या रुग्णांना कोरोना होतं, हे हीपूर्ण सत्य नाही. सानिकाच्या भावचं म्हणणं आहे की रत्नागिरीतील डॉक्टरांना हे वेळीच ओळखता आलं असतं तर कदाचित सानिकाचा डोळा वाचला असता.
सानिकाला नेमकं काय होता त्रास?
सानिकाची शस्त्रक्रिया ज्या डॉक्टरांनी केली त्यांच्या मते महाराष्ट्र्रात तरी हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदात इतका लहान मुलीचा म्युकरमायकोसिसमुळे डोळा काढावा लागला. त्यांच्या मते इतक्या जलद गतीने म्युकरची वाढ होताना आणि मानवी शरीराला अपाय करताना त्यांनी याआधी पाहिलं नाही. म्युकरमध्ये काही म्युटंट किंवा बदललेलं रूप आहे का ते पाहावं लागेल. असं डॉ निनाद गायकवाड यावेळी म्हणाले.
हे ही वाचा-Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं कितपत गरजेचं? वाचा काय सांगतात तज्ज्ञ
काय आहे डॉक्टरांचं म्हणणं?
-म्युकर इतकं झपाट्याने पसरत नाही
-म्युकरमध्ये काही म्युटंट आहे का हे पाहावे लागेल
-याआधी ही लहान मुलांना म्युकर मायकोसिसची लागण झाली आहे. पण कधी डोळा काढावा लागला नाही
-म्युकर नाकातून जातं, त्यामुळे मास्क लावल्याने कोरोना आणि म्युकर दोन्ही पासून दूर राहू शकतो
-वेळीच म्युकरच निदान झालं असतं तर कदाचित तिचा डोळा वाचू शकला असता.
-ग्रामीण भागांतील डॉक्टरांना म्युकर कसा ओळखावा याच्या ट्रेनिंगची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient