मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वर्षभरापासून अंत्यसंस्काराविना; रुग्णालयाचा भयंकर निष्काळजीपणा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वर्षभरापासून अंत्यसंस्काराविना; रुग्णालयाचा भयंकर निष्काळजीपणा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मृत्यू झालेल्या रुग्णांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह घेण्यासाठी न आल्याने वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत हे मृतदेह तसेच पडून आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

बंगळुरू, 29 नोव्हेंबर : कर्नाटकमध्ये (Karnataka) एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे जुलै 2020 मध्ये कोविड-19 मुळे (Covid-19 Death) जीव गमावलेल्या दोन रुग्णांचे मृतदेह शहरातील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयात वर्षभराहून अधिक काळ सडत पडले आहेत. ESIC च्या शवगृहात असलेल्या रुग्णांच्या मृतदेहामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (patients who died of corona have not been cremated for over a year)

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2020 मध्ये एक 40 वर्षीय महिला आणि सुमारे 55 वर्षीय पुरुष कोरोनाव्हायरस संसर्गाच्या (Coronavirus Infection) उपचारासाठी राजाजीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतरच्याच महिन्यात काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून या रुग्णांचे मृतदेह कोणीही घेण्यास आलं नाही. अंत्यसंस्कार न झाल्याने शवागारात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राजाजीनगरचे आमदार आणि माजी मंत्री एस सुरेश कुमार यांनी कर्नाटकचे कामगार मंत्री ए शिवराम हेब्बर यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करून या अमानवी घटनेला जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याची विनंती केली आहे. यासंदर्बाच कुमार म्हणाले की, जुलै 2020 मध्ये ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोविड -19 च्या पहिल्या लहरीदरम्यान दोन लोकांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-RT-PCR टेस्टनं ओळखता येऊ शकते ओमिक्रॉन व्हेरिएंट?, WHO नं दिलं उत्तर

कुमार यांनी पुढे लिहिलं की, ग्रेटर बंगळुरू महानगरपालिका आणि ईएसआय अधिकाऱ्यांचे हे कृत्य अत्यंत गंभीर आणि निष्काळजीपणाचं आहे. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, सविस्तर चौकशी अहवाल मागवून आणि या अमानुष कृत्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे. अशा घटना कुठेही घडू नयेत, असे कुमार यांनी आपल्या भावनिक पत्रात म्हटले आहे.

First published:

Tags: Corona, Corona patient, Karnataka