मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात जाणवणार ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा, केंद्राला मागील वर्षीच सावध केल्याचा रिपोर्टमधून दावा

देशात जाणवणार ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा, केंद्राला मागील वर्षीच सावध केल्याचा रिपोर्टमधून दावा

सिलेंडरमधून ऑक्सिजन घेताना काळजी घ्यायला हवी.

सिलेंडरमधून ऑक्सिजन घेताना काळजी घ्यायला हवी.

केंद्राला या तुटवड्याबद्दल आधीच सावध करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेच्या काही महिन्यांपूर्वीच संसदेच्या स्थायी समितीनं सरकारला सुचवलं होतं, की रुग्णालयांमध्ये बेड (Beds) आणि ऑक्सिजनचं (Oxygen) प्रमाण वाढवावं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 एप्रिल : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) प्रसार अतिशय झपाट्यानं होत आहे. या परिस्थितीमध्ये गंभीर रुग्णांची संख्याही वाढली असल्यानं ऑक्सिजनचा मोठा तुटवडा (Shortgae of Oxygen) जाणवत आहे. इतकंच नाही तर रुग्णांना दाखल करण्यासाठीही रुग्णालयांमध्ये जागा नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. ऑक्सिजनअभावी आतापर्यंत अनेक कोरोना रुग्णांनी (Corona Patients) आपले जीव गमावले आहेत. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे, की केंद्राला या तुटवड्याबद्दल आधीच सावध करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेच्या काही महिन्यांपूर्वीच संसदेच्या स्थायी समितीनं सरकारला सुचवलं होतं, की रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवावं.

आरोग्यविषयक स्थायी समितीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या अहवालात असे म्हटले होते की, राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइस ऑथॉरिटीने उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी परवडणाऱ्या दराने ऑक्सिजन सिलेंडरची किंमत निश्चित करावी. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि यात भाजपचे 16 सदस्यही आहेत.

समितीनं म्हटलं होतं, की समितीनं सरकारला असं सुचवलं होतं,की ऑक्सिजनचं उत्पादन आणखी वाढवा जेणेकरुन रुग्णालयांमध्ये याची उपलब्धता होऊ शकेल. समितीनं असंही म्हटलं, की कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता देशातील सरकारी रुग्णालयांमधील बेडची संख्या पुरेशी नाही. रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता आणि व्हेंटिलेटरची कमी यासारख्या कारणांमुळे महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांवरही परिणाम होत आहे. आरोग्य यंत्रणेच्या खराब परिस्थितीचा उल्लेख करत समितीनं असंही सुचवलं होतं, की आरोग्य व्यवस्थेकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे.

First published:

Tags: Central government, Corona virus in india, Oxygen supply