Home /News /coronavirus-latest-news /

'पांडुरंगा आता बस कर, कोरोनातून सर्वांना मुक्ती दे', पुण्यातील 80 वर्षांच्या बेनकर आजीच्या 34 दिवसांच्या लढ्याला यश

'पांडुरंगा आता बस कर, कोरोनातून सर्वांना मुक्ती दे', पुण्यातील 80 वर्षांच्या बेनकर आजीच्या 34 दिवसांच्या लढ्याला यश

बेनकर कुटुंबातील तब्बल 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने सर्वजण सुखरुप घरी परतले आहेत. यावेळी आजीने आपला अनुभव कथन केला आहे.

पुणे, 22 मे : पुण्यातील धायरी येथील ठकूबाई नारायण बेनकर या 80 वर्षांच्या आजीने तब्बल 34 दिवस लढा देत कोरोनावर मात केली आहे. बेनकर यांच्या कुटुंबीयात एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये 6 वर्षांच्या अद्वैत सुमित बेनकर पासून ते 80 वर्षांच्या ठकूबाई नारायण बेनकर यांना कोरोनाने घेरले होते. पण हे सर्वजण कोरोनावर मात करून सर्वजण घरी परतलेत. तब्बल 34 दिवस लढा देत कोरोनावर विजय मिळवून ठकूबाई बेनकर यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराने पुष्पवृष्ठी वाहून त्यांचे स्वागत केले. ठकूबाई बेनकर यांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याने त्यांच्यावर याआधी दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांचा स्कोर 9 आला होता. तब्बल 18 दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली आणि त्या सुखरूप घरी परतल्यात.  या ठकूबाई आजींनी तब्बल 23 वेळा आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाची पायी वारी केली आहे. पांडुरंगा आता बस कर, या कोरोनातून सर्वांना मुक्ती दे, अशी आर्त हाकच या आंनी विठुरायाकडे घातली आहे. हे ही वाचा-16 वर्षाच्या पुणेकर मुलाने Click केले चंद्राचे भन्नाट फोटो, तुम्हीही कराल कौतुक पुणे शहरातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी कमी झालीय पण चालू आठवड्यात तब्बल तीन वेळा दैनंदिन रूग्णवाढीचा आकडा हा तीन अंकी संख्येच्या आत म्हणजेच हजाराच्या खाली राहिलाय. तसंच आता ऑक्सीजन बेडसही रिक्त राहू लागलेत. ग्रामीण भागात माञ अजूनही म्हणावी तशी कोरोनाची साथ आटोक्यात येताना दिसत नाही. थोडक्यात शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात पसरू लागल्याचं काही ठिकाणी बघायला मिळतंय.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona patient, Corona spread, Mother

पुढील बातम्या