• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • इम्रान खाननंतर पाकिस्तानातून आली आणखी एक धक्कादायक बातमी

इम्रान खाननंतर पाकिस्तानातून आली आणखी एक धक्कादायक बातमी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी कोरोनाची चीन निर्मित लस घेतली होती. त्यानंतर 20 मार्च रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली

 • Share this:
  लाहोर, 21 मार्च : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी कोरोनाची चीन निर्मित लस घेतली होती. त्यानंतर 20 मार्च रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यातच पाकिस्तानातून आणखी एक बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांची पत्नी बेगम बुशरा बीबी यादेखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. (Imran Khans wife Corona positive) आरोग्यविषयक माहिती देताना पाकिस्तान पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक फैसल सुल्तान यांनी सांगितलं की, इम्रान खानने कोरोना चाचणी आल्यानंतर स्वत:ला आयसोलेट केलं आहे. इम्रान खानने गुरुवारी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर इम्रान खान यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बाब समोर आली आहे. हे ही वाचा-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोविड पॉझिटिव्ह; 2 दिवसांपूर्वी घेतली होती लस गुरुवारी घेतली होती कोरोना लस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना महासाथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. (Pakistan Prime Minister Imran Khan Covid 19 positive) चीन निर्मित साइनोवॅक कोविड लशीची पहिला डोज घेतला होता. इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्वीट करीत सांगितलं होतं की, पंतप्रधान इम्रान खान यांनी लस घेतली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, देशात आतापर्यंत 623135 नागरिक संक्रमित झाले आहेत. गेल्या 24 तासात 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे मृतांचा आकडा 13799 पर्यंत पोहोचला आहे. मंत्रालयाने सांगितलं की, देशात आतापर्यंत एकूण 579760 नागरिक बरे झाले आहेत. तर 2122 रुग्णांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संक्रमण दर वाढून 9.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: