Home /News /coronavirus-latest-news /

BREAKING : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान Covid-19 पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चिनी लस

BREAKING : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान Covid-19 पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चिनी लस

दोन दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी चिनी निर्मित कोविड-19 ची लस घेतली होती.

    पाकिस्तान, 20 मार्च : जगभरात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोविड-19 चा पहिला डोज घेतला होता. (Pakistan Prime Minister Imran Khan Covid 19 positive) कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घरातचं क्वारंटाइन झाले आहेत. पाकिस्तानच्या आरोग्यमंत्रींनी याबाबत माहिती दिली. 68 वर्षीय इम्रान खान हे सुरुवातीच्या काळात टॉप एथलिट आणि स्पोर्ट्समॅन होते. कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती. हे ही वाचा-कोरोना लसीकरणात या देशाला मोठं यश; दिली सर्वात पहिली GOOD NEWS गुरुवारी घेतली होती कोरोना लस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना महासाथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. (Pakistan Prime Minister Imran Khan Covid 19 positive) चीन निर्मित साइनोवॅक कोविड लशीची पहिला डोज घेतला होता. इम्रान खान यांच्या कार्यालयाने ट्वीट करीत सांगितलं होतं की, पंतप्रधान इम्रान खान यांनी लस घेतली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, देशात आतापर्यंत 623135 नागरिक संक्रमित झाले आहेत. गेल्या 24 तासात 40 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे मृतांचा आकडा 13799 पर्यंत पोहोचला आहे. मंत्रालयाने सांगितलं की, देशात आतापर्यंत एकूण 579760 नागरिक बरे झाले आहेत. तर 2122 रुग्णांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संक्रमण दर वाढून 9.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Corona vaccine, Coronavirus, Covid-19, Imran khan, Vaccinated for covid 19

    पुढील बातम्या