• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • 'कोरोनाच्या संकटात पाकिस्तान भारतीयांसोबत, दोघे मिळून सामना करू' - इम्रान खान

'कोरोनाच्या संकटात पाकिस्तान भारतीयांसोबत, दोघे मिळून सामना करू' - इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाच्या लाटेमध्ये आम्ही भारतीयांसोबत असून मानवतेच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांनी एकत्रित येत या जागतिक संकटाचा सामना करावा, असं ट्वीट केलं आहे.

 • Share this:
  पाकिस्तान, 24 एप्रिल : सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या दैनंदिन संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. तसेच मृत्यूदर ही काहीसा वाढलेला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून औषधे, आॅक्सिजन तसेच बेडसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. तिकडे पाकिस्तानदेखील (Pakistan) काहीसे असेच चित्र पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 157 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने (Pakistan Health Ministry) सांगितले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांनी आम्ही या संकटात भारतीयांसोबत आहोत असे सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाच्या लाटेमध्ये आम्ही भारतीयांसोबत असून मानवतेच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांनी एकत्रित येत या जागतिक संकटाचा सामना करावा, असे सांगितले. आपल्या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, भारतीय नागरिक सध्या अत्यंत धोकादायक अशा कोरोनाच्या लाटेविरुध्द लढा देत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या महामारीच्या काळात जगातील सर्व लोकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. हे मानवतेसमोरील (Humanity) जागतिक आव्हान (Global Challenge) आहे, या विरोधात आपण एकत्र लढा दिला पाहिजे. कोविड-19 च्या या धोकादायक लाटेत आम्ही भारतीय नागरिकांसोबत आहोत. हे ही वाचा-सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकाला लागण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही पीडित कुटुंबांबद्दल मनापासून सहानुभुती व्यक्त केली आहे. कुरेशी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, कोरोनाच्या सध्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीय जनतेला पाठिंबा दर्शवतो. या लाटेमुळे आपल्याही प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी जनतेच्यावतीने मी भारतातील पीडीत कुटुंबांबद्दल मनःपूर्वक सहानुभुती व्यक्त करतो. शनिवारी प्रसिध्द झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात एका दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोनाबाधितांची संख्या 3,46,786 झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,66,10,481 असून सक्रिय (Active Cases) रुग्णसंख्येने 25 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकाच दिवसांत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा हा 2624 नोंदला गेला आहे. तर मृतांची एकूण संख्या 1,89,544 झाली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 157 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच नव्याने 5908 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
  First published: