मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

गेल्या वर्षी याच दिवशी पुणेकरांना बसला होता धक्का; पुन्हा एकदा 9 मार्चलाच झाला घात

गेल्या वर्षी याच दिवशी पुणेकरांना बसला होता धक्का; पुन्हा एकदा 9 मार्चलाच झाला घात

Coronavirus in Pune: गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी कोरोनाने पुणेकरांना (First Corona Patient in Pune) धक्का दिला होता.

Coronavirus in Pune: गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी कोरोनाने पुणेकरांना (First Corona Patient in Pune) धक्का दिला होता.

Coronavirus in Pune: गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी कोरोनाने पुणेकरांना (First Corona Patient in Pune) धक्का दिला होता.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 09 मार्च : जगात कोरोना विषाणूचा उद्भाव होऊन आज साधारण वर्षाहून जास्त कालावधी लोटला आहे. कोरोना विषाणूचा फटका जगातील प्रत्येक व्यक्तीला बसला आहे. महाराष्ट्रातही (Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा शिरकाव होऊन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजच्याच दिवशी कोरोनानं महाराष्ट्रात शिरकाव करून पुणेकरांना जबरदस्त धक्का दिला होता. गेल्यावर्षी या आठवड्यात कुणाला कानोकान खबरही नव्हती की, कोरोना विषाणू एवढं रौद्ररुप धारण करेल. पण कोरोना विषाणूने तब्बल आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी संपूर्ण देश बंद पाडला होता. 09 मार्च 2020 रोजी पुण्यात (First Corona Patient in Pune) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दुबईहून पुण्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग (Corona Positive) झाला होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती इतकी चिघळत गेली की, संपूर्ण जगात लॉकडाऊन जाहीर करावं लागलं होतं. या वर्षभराच्या कालावधी. लॉकडाऊन, कर्फ्यू, अनलॉक, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन हे शब्द अगदी नेहमीच्या वापराचे झाले आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी कोरोना विषाणूने पुणेकरांना धक्का दिल्यानंतर, आज कोरोना शिरकावाच्या वर्षापूर्ती दिवशी कोरोनाने पुन्हा पुणेकरांचा घात केला आहे. कारण ऑक्टोबर 2020 नंतर कोरोनाचा ग्राफ उतरणीला लागला होता, पण फेब्रुवारीनंतर कोरोनाने पुन्हा उसळी घेतली आहे. ऑक्टोबरनंतर आज पुण्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येनं 1 हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. आज पुण्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले 1086 रुग्ण आढळले आहेत, तर 795 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात 321 रुग्णांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. तर आज पुण्यात एकूण 11 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, यामध्ये पाच जण पुण्याबाहेरील आहेत. हे ही वाचा -  गेल्यावर्षी या आठवड्यापर्यंत सर्वकाही होतं आलबेल, पण 9 मार्च 2020 रोजी बदललं पुणेकरांसह राज्याचं जीवन गेल्या वर्षभरात पुण्यातील 2 लाख 10 हजार 169 जणांना कोरोना विषाणूने ग्रासलं होतं. यातील 1 लाख 98 हजार 246 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पण 4 हजार 903 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या पुण्यात एकूण 7020 कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. पण ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णांची ओसरलेली लाट पुन्हा एकदा जोर पकडत आहे. ही बाब पुणेकरांसह संपूर्ण देशातील लोकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
First published:

Tags: Corona updates, Covid19, Fight covid, India, Pune

पुढील बातम्या