मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron ची तिसरी लाट आली तर दररोज 14 लाख रुग्ण सापडतील - तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Omicron ची तिसरी लाट आली तर दररोज 14 लाख रुग्ण सापडतील - तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Covid-19, Coronavirus, Omicron, Third Covid Wave: ओमिक्रॉन हा प्रकार अपडेट डेल्टा (Covid-19 Delta Variant) पेक्षा कमी गंभीर असेल. परंतु, तो कोविडच्या तिसऱ्या लाटेचं प्रमुख कारण बनू शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांना वाटतं. येत्या एक ते दोन महिन्यांत ओमिक्रॉन अधिक धोकादायक ठरू शकतो

Covid-19, Coronavirus, Omicron, Third Covid Wave: ओमिक्रॉन हा प्रकार अपडेट डेल्टा (Covid-19 Delta Variant) पेक्षा कमी गंभीर असेल. परंतु, तो कोविडच्या तिसऱ्या लाटेचं प्रमुख कारण बनू शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांना वाटतं. येत्या एक ते दोन महिन्यांत ओमिक्रॉन अधिक धोकादायक ठरू शकतो

Covid-19, Coronavirus, Omicron, Third Covid Wave: ओमिक्रॉन हा प्रकार अपडेट डेल्टा (Covid-19 Delta Variant) पेक्षा कमी गंभीर असेल. परंतु, तो कोविडच्या तिसऱ्या लाटेचं प्रमुख कारण बनू शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांना वाटतं. येत्या एक ते दोन महिन्यांत ओमिक्रॉन अधिक धोकादायक ठरू शकतो

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवीन प्रकार,ओमिक्रॉन (Covid-19 New Variant Omicron), सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ओमिक्रॉनमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (Covid 19 Third Wave) धोका वाढला आहे, त्यानंतर भारतासह सर्व देश पुन्हा एकदा प्रवासी-बंदीसारखं पाऊल उचलत आहेत. ओमिक्रॉन हा प्रकार अपडेट डेल्टा (Covid-19 Delta Variant) पेक्षा कमी गंभीर असेल. परंतु, तो कोविडच्या तिसऱ्या लाटेचं प्रमुख कारण बनू शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांना वाटतं. येत्या एक ते दोन महिन्यांत ओमिक्रॉन अधिक धोकादायक ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण आता अनेक देशांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

सध्या (Omicron in Europe) अनेक युरोपीय देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. या देशांनी लहान मुलांसह आपल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी कोविडचा बूस्टर डोस (Covid-19 Vaccine Booster Dose) दिला आहे. दरम्यान, भारतातील आरोग्य तज्ज्ञांनीही ओमिक्रॉन विषाणूविरूद्ध (Omicron Virus) लढण्यासाठी बूस्टर डोस आणि कोविड प्रोटोकॉलचं (Covid protocol) पालन करण्यावर भर दिला आहे.

दोन ते तीन महिन्यांत परिणाम दिसून येतो

तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉन हा कोविडच्या डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर आहे आणि आतापर्यंत या विषाणूचं कोणतंही गंभीर प्रकरण नोंदवलं गेलेलं नाही. परंतु, त्याचा प्रसार दर आरोग्य तज्ज्ञांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे. पल्मोनोलॉजीचे अध्यक्ष डॉ. जी. सी. खिलनानी म्हणाले, 'पश्चिम युरोपमध्ये उद्रेक झाल्यापासून 3-4 महिन्यांच्या अंतरानंतर आपण भारतात कोविड-19 चा प्रसार झाल्याचं पाहिलं आहे. म्हणून आपण दुसऱ्या लाटेत होतो, तसं सतर्क राहणे आवश्यक आहे.

बूस्टर डोसची मागणी

ते म्हणाले की, दिलेल्या लसीची तीव्रता कालांतरानं कमी होते. त्यामुळं संक्रमण टाळण्यासाठी कॉमरेडिटी असलेल्या लोकांना कोविडचा बूस्टर डोस देण्याचं धोरण जाहीर करण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन आणि कोविडची प्रकरणं वेगानं समोर येत आहेत. त्यामुळं येत्या काही महिन्यांत या प्रकाराचा प्रभाव भारतातही दिसून येण्याची शक्यता आहे.

हे वाचा - Ashes Series : इंग्लंडने लाज घालवली! 140 वर्षांमधली सगळ्यात खराब कामगिरी

सफदरजंग रुग्णालयाच्या कोविड-19 नोडल अधिकारी डॉ. शीबा मारवाह यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनचा संसर्ग दर डेल्टाच्या तुलनेत 70 टक्के जास्त आहे, जो अतिशय चिंताजनक प्रसार दर आहे. त्या म्हणाल्या की, हा प्रकार पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांनाही बळी बनवू शकतो.

तिसऱ्या लाटेत दररोज 14 लाख केसेस

आतापर्यंत, भारतात 100 हून अधिक ओमिक्रॉन प्रकरणं (Omicron Cases in India) नोंदवली गेली आहेत. हा कोरोना विषाणू प्रकार 11 राज्यांमध्ये पसरला आहे. शुक्रवारी, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही इशारा दिला की, ब्रिटनमध्ये या विषाणूमुळं कोविडच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, जर भारतात लोकसंख्येच्या पातळीवर याचं संक्रमण होत असेल तर, याचा अर्थ भारतात दररोज 14 लाख कोविड केसेस नोंदवल्या जाऊ शकतात.

हे वाचा - चीनमधील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन! वयाच्या 135 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, काय होतं दीर्घायुष्याचं रहस्य?

दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयानं लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितलं आहे. यासोबतच नववर्षाचं सेलिब्रेशन रद्द करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, यावेळी ओमिक्रॉनचा प्रसार युरोपसह जगभरात झपाट्यानं होत आहे. त्यामुळं अनावश्यक प्रवास थांबवा आणि मोठ्या प्रमाणात एकत्र येणंही टाळा.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus