मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Delta च्या संकटात Omicron चा उगम म्हणजे GOOD NEWS; तज्ज्ञांकडून मोठा दिलासा

Delta च्या संकटात Omicron चा उगम म्हणजे GOOD NEWS; तज्ज्ञांकडून मोठा दिलासा

ओमिक्रॉन (Omicron) हा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

ओमिक्रॉन (Omicron) हा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

ओमिक्रॉन (Omicron) हा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron) भीती पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या ओमिक्रॉन (Corona new Variant) या व्हेरिएंटमुळे जगभरातले सर्व देश पुन्हा सतर्क झाले आहेत (Omicron symptoms) . भारतातही ठिकठिकाणी नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत; पण वैज्ञानिकांच्या मते, ओमिक्रॉन हा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटसाठी धोक्याची घंटा (Omicron not Harmful for us) ठरू शकतो.

    18 नोव्हेंबरला ओमिक्रॉन या कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला. कोरोनाचा वेगळा स्ट्रेन रुग्णांमध्ये दिसून आल्याचा संशय सगळ्यात आधी डॉ. अँजेलिक कॉट्झी  यांना आला होता. त्या उपचार करत असलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची लक्षणं न दिसता, वेगळीच लक्षणं दिसल्यामुळे आपल्याला असा संशय आल्याचं डॉ. कॉट्झी यांनी सांगितलं. पण या स्ट्रेनची लागण झालेल्यांना अगदी सौम्य लक्षणं (Omicron symptoms) दिसत असल्याचं अँजेलिक यांनी स्पष्ट केलं आहे. ही लक्षणं इतकी सौम्य (Omicron shows mild symptoms) आहेत, की ओमिक्रॉनची लागण झालेल्यांवर अगदी घरीच उपचार घेता येणं शक्य असल्याचं डॉक्टर कॉट्झी यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं.

    ओमिक्रॉनची लक्षणं

    ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यावर दिसणारी लक्षणं डेल्टा व्हेरिएंटएवढी तीव्र नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर रुग्णांना ज्याप्रमाणे चव आणि वास ओळखणं अशक्य होतं, तसं काहीही ओमिक्रॉनच्या बाबतीत होत नाही. तसंच डेल्टाची लागण झाल्यानंतर सर्वांत गंभीर लक्षण म्हणजे रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते. हेदेखील ओमिक्रॉनची लागण (Symptoms of Omicron variant) झाल्यानंतर होत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

    आतापर्यंत 40 वर्षांहून कमी वयोगटातल्या व्यक्तींना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. तसंच, ओमिक्रॉनची लक्षणं आढळलेल्या निम्म्या रुग्णांचं लसीकरण झालं नव्हतं, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. ओमिक्रॉनच्या प्रमुख लक्षणांमध्ये (Omicron main symptoms) एक किंवा दोन दिवसांसाठी प्रचंड थकवा जाणवणं, डोकेदुखी आणि अंगदुखी या गोष्टींचा समावेश होतो.

    डेल्टावर भारी पडू शकतो ओमिक्रॉन

    आतापर्यंत कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सपैकी (Corona deadliest variant) डेल्टा हा सर्वांत घातक व्हेरिएंट ठरला आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्यालाही डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) कारणीभूत असल्याचं कित्येक अभ्यासांमध्ये सिद्ध झालं आहे. सध्या नव्याने आढळलेला ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा जास्त वेगाने पसरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या प्राथमिक अंदाजात म्हटलं आहे. ही खरं तर चांगली बातमी असल्याचं मत व्हायरॉलॉजिस्ट मार्क व्हॅन रांस्ट यांनी व्यक्त केलं आहे.

    "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी घातक आणि जास्त वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. हे खरं असेल, तर लवकरच ओमिक्रॉन जगभरात डेल्टाची जागा (Omicron might replace Delta) घेऊ शकेल. डेल्टाच्या तुलनेत यावर उपचार करणं अधिक सोपं असल्यामुळे ही आपल्यासाठी गुड न्यूज ठरू शकते", असं मार्क म्हणाले.

    हे वाचा - RT-PCR टेस्टनं ओळखता येऊ शकते ओमिक्रॉन व्हेरिएंट?, WHO नं दिलं उत्तर

    इस्रायलमधल्या हादसाह युनिव्हर्सिटी हॉस्पिटल इन कारेम या ठिकाणी कार्यरत असलेले प्राध्यापक ड्रॉर मेझॉराच यांनीदेखील या अंदाजाला दुजोरा दिला आहे. "जर ओमिक्रॉनचा प्रसार असाच सुरू राहिला, तर डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असा विषाणू सगळीकडे असेल आणि जागतिक स्तरावर त्याचा सामना (Omicron is easier to deal with) करणं आपल्याला डेल्टाच्या तुलनेत अधिक सोपं जाईल", असं मेझॉराच म्हणाले. एफक्स स्ट्रीट या स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.

    अर्थात, असं काही मान्य करणं घाईचं होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. हा नवा व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत आणि विशेषतः डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने पसरणारा आणि कमी घातक (Omicron is less lethal and more transmissible) असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबतही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंत 40 वर्षांहून कमी वयातल्या व्यक्तींना याची सौम्य लक्षणं असल्याचं दिसून आलं आहे. मात्र सर्वांवर याचा नेमका कसा परिणाम होतो, हे समजण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

    ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी प्रभावी

    या नव्या व्हेरिएंटवर सध्याच्या लशी प्रभावी आहेत का, हा प्रश्न जवळपास सर्वांनाच पडला आहे. आपल्याला नव्या व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचं मत ब्रिटनमधले मायक्रोबायोलॉजिस्ट प्रा. कॅलम सेम्पल यांनी व्यक्त केलं आहे. 'सध्या उपलब्ध असणाऱ्या लशी ओमिक्रॉनला थांबवण्यासाठी पुरेशा (Current vaccines are strong enough against Omicron) आहेत,' असं ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.

    "सध्या पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती या व्हेरिएंटला थोपवण्यासाठीही सक्षम आहे. याची लागण झाली, तरी त्याची लक्षणं अगदीच सौम्य असणार आहेत. तुम्हाला कदाचित थोडीशी डोकेदुखी आणि सर्दी होईल; पण लसीकरण झालेल्यांना याची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागण्याची किंवा दुर्दैवाने मृत्यू होण्याची भीती अगदीच कमी आहे,” असं कॅलम यांनी स्पष्ट केलं.

    हे वाचा - डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन 6 पट संसर्गजन्य! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

    दरम्यान, या व्हेरिएंटबाबत माहिती मिळताच देशातल्या यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. तसंच, महाराष्ट्रातही सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना पुन्हा एकदा फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कसंबंधी नियमांची आठवण करून दिली जात आहे. तसंच, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास दंडही वसूल केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या लसीकरणाचा वेगही आणखी वाढवण्यात आला आहे.

    या सगळ्यातच हा व्हॅरिएंट तितका घातक नसल्याचं समजणं नक्कीच दिलासादायक आहे. कोरोनाचा हा नवा व्हॅरिएंट आपल्यासाठी धोक्याची घंटा नसल्याचं जगभरातल्या वैज्ञानिकांचं म्हणणे आहे; मात्र तरीही या व्हॅरिएंटबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे अधिक खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Coronavirus, Lifestyle