• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • सलाम! बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोडली नोकरी; पतीसोबत सुरू केली समाजसेवा

सलाम! बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोडली नोकरी; पतीसोबत सुरू केली समाजसेवा

बेवारस मृतदेहांवर (Unclaimed Dead Bodies) अंत्यसंस्कार करत समाजसेवा करण्यासाठी एका नर्सनं आपली नोकरी सोडली आहे. आता ती या कामात आपल्या पतीची मदत करत आहे.

 • Share this:
  भुवनेश्वर 24 मे : कोरोनानं (Coronavirus) देशासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना सतत आपलं रूप बदलत असल्यानं चिंता आणखीच वाढली आहे. यामुळे मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे. या काळात असंही अनेकदा होत आहे, की मृतांचे अंत्यसंस्कार (Last Rites) करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय समोर येत नाहीत. अशाच बेवारस मृतदेहांवर (Unclaimed Dead Bodies) अंत्यसंस्कार करत समाजसेवा करण्यासाठीही अनेक लोक पुढे सरसावले आहेत. यात ओडिसातील एक जोडपंही आहे. बाकीच्या लशी जातात कुठे?देशात महिन्याला 8.5कोटी डोसची निर्मिती मात्र वापर 5 कोटी एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मधुस्मिता प्रुस्ति कोलकाताच्या एका बड्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. तर, त्यांचे पती भुवनेश्वरमध्ये बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे. यात कोरोना रुग्णांचे मृतदेहही असतात. याचदरम्यान मधुस्मितादेखील आपली नोकरी सोडून भुवनेश्वरमध्ये आल्या आणि या भल्या कामाता त्यांनी आपल्या पतीला हातभार लावण्यास सुरुवात केली. श्रीलंकेनंतर आणखी एका टीममध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रॅक्टिस स्थगित मधुस्मिता यांनी सांगितलं, की त्यांनी 9 वर्ष नर्सचं काम केलं आहे. मात्र, 2019 मध्ये त्या भुवनेश्वरमध्ये परत आल्या आणि आपल्या पतीला त्याच्या कामात साथ देऊ लागल्या. आता दोघंही बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अडीच वर्षात त्यांनी जवळपास 500 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यात मागील वर्षी भुवनेश्वरमध्ये झालेल्या 300 कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचाही समावेश आहे. त्यांनी सांगितलं, की एक महिला असून हे काम करत असल्यानं अनेकजण माझी निंदा करतात आणि माझ्यावर टीकाही करतात. मात्र, माझा पती चालवत असलेल्या ट्रस्टच्या अंतर्गत मी हे काम करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: