टेनेसी (अमेरिका), 19 डिसेंबर : कोरोनानं (corona) सगळ्या जगाचं आयुष्य धोक्यात आणलं आहे. अगदी उत्तर-दक्षिण ध्रुवावरही करोनाचा संसर्ग पोचला. सध्या जगासमोर सगळ्यात मोठं लक्ष्य कुठलं असेल, तर करोनावरची खात्रीशार लस (vaccine) मिळवणं. लशीच्या ट्रायल्स (vaccine trials) विविध देशांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहेत.
विविध स्वयंसेवक आणि रुग्णही जीवाची बाजी लावत लस टोचून घेत आहेत. अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण वेगात सुरू आहे. यादरम्यानच टिफनी डोवर या नर्सला देण्यात आलेल्या लशीमुळे ती थेट बेशुद्ध पडली. तिचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
लस टोचून घेण्याआधी टिफनी अमेरिकेच्या टेनेसी शहरातल्या सीएचआय मेमोरियल हॉस्पीटलबाहेर पत्रकार परिषद घेत होती. यात ती लस टोचून घेतल्यानंतरच्या अनुभवाबाबात पत्रकारांशी प्रश्नोत्तरं करत होती. या लशीबाबत आम्ही सगळे खूप आशावादी आहोत असं ती म्हणताना दिसते. मात्र काही मिनिटातच तिला चक्कर आल्याने कोसळून पडते, असं या व्हिडीओत दिसतं. फायजरच्या लशीकोरमुळे ही गुंतागुंत उद्भवली.
यावर डॉक्टर म्हणतात, की टिफनीच्या चक्कर येण्याचं कारण लसीकरण हे नाही. याआधीही खूप जास्त वेदना झाल्यावर टिफनीची शुद्ध हरपल्याचं त्यांनी पाहिलं आहे.
Tiffany Dover, a nurse in the Covid-19 unit passes out on live TV after taking vaccine in Chattanooga, Tennessee.
She is feeling better. 🙏🏻#COVID19 #vaccine #Tennessee
— ~ Marietta (@MDavisbot) December 18, 2020
ब्लूटीवीयी-९ शी संवाद करताना टिफनी म्हणाली, की तिला अचानक वाटलं, की अचानक तब्येत बिघडण्याच्या अवस्थेला आपण पोचलो आहोत. आता मात्र टिफनीची तब्येत एकदम चांगली आहे. पडल्याने तिच्या हाताला दुखापत झाली होती व तो दुखत होता. आता मात्र तिचा हात नीट आहे.
कोरोनाचं सावट दूर होण्यासाठी सध्या तरी लस हाच एकमेव पर्याय दिसतो आहे. मात्र लसीकरणाचेही कमीआधिक दुष्परिणाम समोर येत असल्याने सामान्यांसह तज्ञांमध्येही संभ्रम कायम आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशनने सांगितल्यानुसार, काही लसींमुळे शुद्ध हरपण्याची समस्या उद्भवू शकते.