Home /News /coronavirus-latest-news /

CORONA नव्हे तर ‘हा’ शब्द ठरला Word Of The Year; सर्वाधिक लोकांनी शोधला त्याचा अर्थ

CORONA नव्हे तर ‘हा’ शब्द ठरला Word Of The Year; सर्वाधिक लोकांनी शोधला त्याचा अर्थ

सध्या पाहावं तिथं कोरोना (corona) कोरोना आणि कोरोना मात्र सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दामध्ये मात्र कोरोना नाही, तर त्याऐवजी दुसराच शब्द आहे.

    न्यूयॉर्क, 09 डिसेंबर : 2020 वर्षात कोरोना (corona) हाच शब्द आपण सर्वात जास्त पाहिला, वाचला आणि ऐकला आहे. मात्र ऐकून आश्चर्य वाटेल सर्वाधिक शोधल्या गेलेल्या शब्दांमध्ये मात्र कोरोना नाही. तर पॅनडेमिक (Pandemic) आहे. मरियम वेब्स्टर डिक्शनरीच्या (Merriam-Webster) वार्षिक शब्दाचा मान यंदा ‘पॅनडेमिक’ (Pandemic) या शब्दाला मिळाला आहे. मरियम वेब्स्टर डिक्शनरीचे 2020 चे प्राईझ या शब्दाला मिळालं आहे. यंदा हा शब्द इतर कोणत्याही शब्दांपेक्षा सर्वाधिक वेळा ऑनलाईन डिक्शनरीवर शोधला गेला आहे. मरियम वेब्स्टर डिक्शनरीने म्हटलं आहे की, कोविड 19 च्या (Covid 19) साथीमुळे जगभरात किमान 1.4 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षभरात हा शब्द असंख्य वेळा शोधला गेला आहे. एक विक्रमच या शब्दाने नोंदवला आहे. कधी कधी केवळ एक शब्द जणू एका युगाची व्याख्या करतो. तसाच यंदा ‘पॅनडेमिक’ हा शब्द या अपवादात्मक अशा कठीण वर्षासाठी अगदी अचूक ठरला आहे. 2020 असं म्हटलं की सर्वात आधी ‘पॅनडेमिक’ हा शब्द मनात येतो, असं मरियम वेब्स्टर डिक्शनरी प्रकाशनानं म्हटलं आहे. मरियम वेब्स्टर डिक्शनरीनुसार, पॅनडेमिक या शब्दाचा अर्थ एखाद्या आजाराचा अनेक देशांमध्ये एकाचवेळी प्रसार होणं आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फटका बसणं असा आहे. या शब्दाचे मूळ ग्रीक शब्द पॅन म्हणजे सर्वत्र आणि डेमोज म्हणजे लोक यात आहे, असंही मरियम वेब्स्टर डिक्शनरीनं स्पष्ट केलं आहे. 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization- WHO) कोविड 19 ही जागतिक साथ असल्याचे जाहीर केलं. त्यावेळेपासून या शब्दाचा शोध प्रचंड वेगानं वाढला. त्या दिवशी तर हा शब्द त्या आधीच्या म्हणजे 2019 मध्ये 11 मार्च रोजी शोधण्यात आलेल्या कोणत्याही शब्दापेक्षा तब्बल 115806 टक्के अधिकवेळा शोधला गेला, असंही 1831 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं म्हटलं आहे. मार्चपासून जगभरात सर्वत्र पॅनडेमिक हा शब्द सर्वत्र बोलला, ऐकला जाऊ लागला. कोविड 19 शी संबधित इतर शब्दही शोधले गेले पण त्याचं प्रमाण पॅनडेमिकच्या तुलनेत कमी होतं. गेल्या वर्षी 'दे' (They) हा शब्द सर्वाधिक वापरला गेलेला शब्द ठरला होता. तो किंवा ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा भेद अधोरेखित न करता एखाद्याचा उल्लेख करता येत असल्यानं हा शब्द वापरण्यावर भर देण्यात आला होता. 2018 मध्ये 'जस्टीस; (Justice), 2017 मध्ये 'फेमिनीझम' (feminism) तर 2016 मध्ये सुररिअल (Surreal) या शब्दांनी हा मान मिळवला होता.
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या