'कोरोना काहीच नाही, ही 2 मोठी संकटं मानवाचा विनाश करतील', प्रसिद्ध विश्लेषकांचा इशारा

'कोरोना काहीच नाही, ही 2 मोठी संकटं मानवाचा विनाश करतील', प्रसिद्ध विश्लेषकांचा इशारा

नोम चॉम्स्की (Noam Chomsky) यांनी असा दावा केला आहे की कोरोना इन्फेक्शन (Covid-19) हे मोठे संकट नक्कीच आहे, मात्र येणाऱ्या काळात जगावर आणखी दोन संकट येणार आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 15 सप्टेंबर : जगावर कोरोनाचे भयावह संकट आहे. जगभरात 2 कोटी 93 लाख 70 हजार 32 रुग्ण आहेत. मात्र अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक नोम चॉम्स्की (Noam Chomsky) यांनी असा दावा केला आहे की कोरोना इन्फेक्शन (Covid-19) हे मोठे संकट नक्कीच आहे, मात्र येणाऱ्या काळात जगावर आणखी दोन संकट येणार आहेत. डीआयईएम -25 टीव्हीशी बोलताना चॉम्स्की म्हणाले की, कोरोनो खूप गंभीर आहे, मात्र अणु युद्ध (Nuclear war) आणि ग्लोबल वार्मिंग (Climate change) ही दोन संकटे मानवाचा विनाश करू शकतात. चॉम्स्की असेही म्हणाले की, सध्या जगभरात ज्या प्रकारची राजकीय आणि आर्थिक स्थिती त्यात या दोन्ही संकटांची भिती दिसत नाही आहे.

डीआयईएम -25 या चॅनलवरील मुलाखतीत नॉम चॉम्स्की म्हणाले की, कोरोना व्हायरस ट्रम्पच्या सरकारच्या काळात आला आहे, त्यामुळे त्याचा धोका हा अधिक जास्त आहे. कोरोना भयंकर आहे आणि त्याचे परिणामही भयंकर होत आहे, पण आपण यातून बाहेर पडू शकतो. मात्र, जगावर असे दोन संकट आहेत, त्यावर कोणी काहीच करत नाही आहे.

वाचा-कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहेत कंपन्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

अमेरिका आणि इतर श्रीमंत देशांनी जबाबदारी घेतली नाही

डाउन टू अर्थ मासिकाच्या या मुलाखतीत चॉम्स्की म्हणाले की सर्वात मोठी विडंबना म्हणजे क्युबा युरोपला मदत करीत आहे. पण दुसरीकडे जर्मनी ग्रीसला मदत करायला तयार नाही. कोरोनाव्हायरसच्या संकटात, आपल्याला कोणत्या प्रकारचे जग हवे आहे, याचा विचार लोकं करू शकतात. प्रगत देश संभाव्य कोरोनाच्या लशीवर काम करत आहेत, मात्र सुरुवातीच्या काळात त्यांनी मोठ्या औषध कंपन्यांनी त्यावर काम करण्यास परवानगी दिली नाही. जेव्हा कोरोनाचा धोका जास्त होता, तेव्हा याच औषध कंपन्या बॉडी क्रिम तयार करत होत्या.

वाचा-कोरोनाच्या धास्तीनं रक्ताच्या नातेवाईकांनीच स्वीकारलं नाही पार्थिव, अखेर....

'कोरोनाकडे गांभीर्यतेने पाहिले नाही'

चॉम्स्की पुढे म्हणाले की, ऑक्टोबर 2019मध्येच अमेरिकेने कोरोनासारख्या संभाव्य साथीचा अंदाज वर्तविला होता, त्यावेळी याकडे गांभीर्यतेने पाहिले नाही. सरकारी संस्थेने तयार केलेल्या लसीद्वारे पोलिओचा धोका कमी झाला मात्र त्याचे पेटंट नव्हते आणि मोठ्या औषध कंपन्यांनी नफ्यामुळे असे होऊ दिले नाही. चॉम्स्की असेही म्हणाले की, "31 डिसेंबर रोजी चीनने WHOला निमोनियाबद्दल माहिती दिली आणि एका आठवड्यानंतर चिनी शास्त्रज्ञांना कोरोनाची ओळख पटली. या सगळ्या गोष्टी माहित असून हे संकट वाढेपर्यंत सर्वांनी वाट पाहिली". नुकत्याच चीनचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली नव्हती तेव्हा पेइचिंगमध्ये कोरोनाबाबत माहितीही मिळाली होती.

वाचा-सरकारच्या एका निर्णयामुळे 38 हजार लोकांचा वाचला जीव, आरोग्य मंत्र्यांचाा दावा

जगभरातील परिस्थिती

जगभरात गेल्या 24 तासांत 1 लाख 80 हजारहून अधिक रुग्ण सापडले. तर, 3 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जगभरातील एकूण रुग्णांची संख्या आता 2 कोटी 93 लाख 70 हजार 32 झाली आहे. तर, 9 लाख 31 हजार 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत 2 कोटी 11 लाख 80 हजार 84 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 1:25 PM IST

ताज्या बातम्या