ना रेमेडेसिविर, ना व्हेंटिलेटर; चाळीसगावातील कर्करोगग्रस्त चिमुरडीने अशी केली कोरोनावर मात

परीला यकृताचा कर्करोग आहे. आठवड्यापूर्वी ही चिमुरडी रुग्णवाहिकेत शेवटच्या घटका मोजत होती.

परीला यकृताचा कर्करोग आहे. आठवड्यापूर्वी ही चिमुरडी रुग्णवाहिकेत शेवटच्या घटका मोजत होती.

  • Share this:
चाळीसगाव, 29 एप्रिल : कोरोनामुळे अनेकांची घरंच्या घरं उद्ध्वस्त झाली. तर कित्येकांनी कोरोनाशी सामना केला आणि ते यशस्वीही झाले. अशीच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. चाळीस गावातील यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेली चिमुरडी कोरोनाच्या संकटातून सुखरुप बाहेर आली आहे. आठवड्यापूर्वी एक चिमुरडी रुग्णवाहिकेत शेवटच्या घटका मोजत होती. तिला व्हेंटिलेटर, ऑक्सिजन नसलं तरी फक्त आमच्या साधा बेड तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी तिच्या पालकांनी चाळीसगाव विकास मंचाकडे केली होती. परी आधीच यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. त्यात कोरोना.. अशा परिस्थितीत बेड मिळणं कठीणच होत. तिच्या पालकांनी बेड मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र सर्वत्र नकार दिला जात होता. अखेर पाचोरा उप जिल्हा रुग्णालयात डॉ. अमित साळुंखे यांनी एक स्टोअर रूम स्वछ करून परीला भरती केलं. हे ही वाचा-कोरोनातील अनोखा लग्नसोहळा; वाजत-गाजत नाही, एका वऱ्हाड्यासोबत वरात नवरीच्या दारात आठवड्यात डॉ. अमित आणि त्याच्या टीमने अथक प्रयत्न करून परीवर उपचार केले. विशेष म्हणजे परीला कुठलाही रेमडिसिव्हरचं इंजेक्शन दिल नाही. किंवा तिला व्हेंटिलेटरवर देखील ठेवलं नाही. एक मदत म्हणून ऑक्सिजन लावण्यात आला होता. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे तिच्यावर उपचार झाले. आज परी पूर्णपणे बरी झाली असून परीला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल आहे. विशेष म्हणजे परीच्या कर्करोगावरील उपचारासाठी चाळीसगाव विकास मंच वैद्यकीय मदत करणार आहे. परीची आई आणि आजोबादेखील यात कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यांना ही चाळीसगाव विकास मंच सहकार्य करीत आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: