मेरठ, 10 जून : सध्या शहरात एका होर्डिंगची खूप चर्चा होत आहे. हे होर्डिंग कोरोना (Corona) बाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी लावण्यात आला आहे. मात्र होर्डिंग पाहून वेगळाच संदेश दिला जात आहे. या नेत्याकडे कोरोनाबाबत ज्ञान कमी असल्याचं दिसून येत आहे. होर्डिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो लावण्यात आले आहे. या नेत्याने स्वत:चा एक मोठा फोटोदेखील लावला आहे. यासोबतच त्यांनी हैराण करणारी बाब लिहिली आहे. त्यांनी होर्डिंगवर लिहिलं आहे की, जर तुम्ही स्वस्थ असाल तर मास्क लावण्याची आवश्यकता नाही.
ही होर्डिंग देवेंद्र भुरंडा यांनी लावला आहे आणि त्यांनी स्वत:ला भाजपचा मंडल मंत्री असल्याचं सांगितलं आहे. हा होर्डिंग पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मास्क न लावण्याच्या सल्ल्याव्यतिरिक्त त्यांनी लिहिलं आहे की, जर तुम्हाला खोकला, ताप वा श्वास घेण्यात अडचण जाणवत असेल तर मास्क लावा, अन्यथा मास्क लावण्याची आवश्यकता नाही.
हे ही वाचा-BJP नेत्याच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, आधी बलात्कार..डोळे काढले, त्यानंतर...
मेरठ दक्षिणचे आमदार सोमेंद्र तोमर यांनी सांगितलं की, भुरंडाकडून ही चूक अज्ञानतेमुळे झाली आहे. त्यांनी आपली चूक स्वीकारली आहे आणि होर्डिंग काढलं आहे. यासोबत ते म्हणाले की, देवेंद्रने यासाठी माफी मागितली आहे आणि पार्टीकडून त्यांना इशाराही देण्यात आला आहे. तोमर यांनी सांगितलं की, पार्टीचे सर्व लोक गाइडलाइन्सचं पालन करीत आहेत आणि मास्क व सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. ते पुढे म्हणाले की, अशी चूक कोणासोबतही होऊ शकते.
एकीकजे जेथे केंद्र सरकार राज्य सरकार सातत्याने लोकांना मास्क लावणे आणि सोशल मीडिया डिस्टेन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रेरित करीत आहे. तर दुसरीकडे भाजपचा एक नेता मात्र नागरिकांना मास्क लावण्याची गरज नसल्याचं सांगत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Corona spread, Face Mask, Mask