मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ना रुग्णवाहिका, ना चार खांदे मिळाले; कारच्या छतावर बांधून वडिलांना नेलं स्मशानात

ना रुग्णवाहिका, ना चार खांदे मिळाले; कारच्या छतावर बांधून वडिलांना नेलं स्मशानात

हे दृश्य पाहून स्मशानभूमीतील अनेकांचं मन हेलावलं.

हे दृश्य पाहून स्मशानभूमीतील अनेकांचं मन हेलावलं.

हे दृश्य पाहून स्मशानभूमीतील अनेकांचं मन हेलावलं.

  • Published by:  Meenal Gangurde

आग्रा, 26 एप्रिल : कोरोनाचा कहर इतका वाढत आहे की, दररोज धक्कादायक वृत्त वाचून मन सुन्न होतं. अनेकांना आपल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही. 6-7 तास रांगेत उभं राहिल्यानंतर मृतदेहांना मुखाग्नी दिली जात आहे. इतकच नाही तर या महासाथीदरम्यान मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाणंही सोपं राहिलं नाही. स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांबरोबरच इतर दुसऱं कुठलंही साधन उपलब्ध होत नसल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अशात एक उत्तर प्रदेशातील आग्रा येथील फोनो व्हायरल होत आहे. जे पाहून तुमचं मन सुन्न होईल.

कारच्या छतावर बांधून घेऊन जात होता वडिलांचा मृतेदह

ही घटना जयपूर हाऊसची आहे. आग्रामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने गेल्या शनिवारी वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. मात्र ह्या वेदना अधिक जास्त वाढल्या जेव्हा मृतदेहाला स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आणि इतर कोणतंही साधन उपलब्ध झालं नाही. शेवटी मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह गाडीच्या छतावर बांधला. आणि अशाच अवस्थेत त्यांना स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेला.

हे ही वाचा-कोरोनाबाधित आईला मुलानं घराबाहेर काढलं; मुलीनंही हकललं, रस्त्यावरच मृत्यू

हे दृश्य पाहून अनेकांचं मन हेलावलं. इतकं करुनही तासंनतास रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांचा क्रमांक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आग्र्यातील ताजगंज स्मशानभूमीत 20 तास सातत्याने मृतदेह जळत आहेत. दररोज येथे कमीत कमी 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. अनेक ठिकाणी तर 6 तासांपर्यंत वेटिंगही पाहायला मिळत आहे. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona cases in India) मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, काल (रविवारी) एका दिवसांत तब्बल 3 लाख 54 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

First published:

Tags: Corona patient, Covid-19 positive