मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना लस बाजारात आली की तुम्ही घेण्यास उत्सुक असाल का? पाहा News18 चा सर्व्हे काय सांगतो

कोरोना लस बाजारात आली की तुम्ही घेण्यास उत्सुक असाल का? पाहा News18 चा सर्व्हे काय सांगतो

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

भारतात सर्व राज्यांनी लसीकरणाची (Vaccination) तयारी पूर्ण केली असून विविध राज्यांत ड्राय रनची(Dry Run) प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 9 जानेवारी: कोरोना व्हायरसच्या संकटाला (Coronavirus Crisis) आता वर्षभराचा काळ लोटला आहे. या काळात अनेक कंपन्यांनी लस (COVID-19 Vaccine) तयार करण्यासाठी प्रयत्न केले असून काही कंपन्यांना यामध्ये यश देखील आले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. भारतात देखील सिरमच्या कोव्हिशील्ड (Covishield) लशीला तात्काळ वापरासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याचबरोबर भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन (Covaxin) लशीला देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सर्वसामान्य नागरिकांना देखील या लशी उपलब्ध होण्याची आशा आहे.

  भारतात सर्व राज्यांनी लसीकरणाची (Vaccination) तयारी पूर्ण केली असून विविध राज्यांत ड्राय रनची(Dry Run) प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या या संकटातून सर्वांना लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. परंतु ही लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर घेण्यासाठी कितीजण उत्सुक आहेत हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर याचे विविध दुष्परिणाम समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून या लस सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्नदेखील पडत आहे. किती नागरिक ही लस घेण्यासाठी उत्सुक आहेत याचं सर्वेक्षण करण्यात आलं.

  YouGov ने न्यूज 18 बरोबर केलेल्या सर्व्हेमध्ये यासंदर्भात काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामधे शहरी भागातील अनेकजण ही लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये 1015 शहरी नागरिकांनी बाजारात ही लस उपलब्ध झाल्यानंतर ती तात्काळ घेण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं. या सर्व्हेमध्ये 68 टक्के शहरी (Urban) नागरिकांनी ही लस बाजारात आल्यानंतर घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे तर 8 टक्के नागरिकांनी यासाठी नकार दिला. 24 टक्के नागरिकांनी अजून काही नक्की नसल्याचे म्हटले आहे. परंतु यामध्ये मुख्य प्रश्न हा या लस बाजारात सर्वसामान्य नागरिकांना कधी उपलब्ध होणार हा आहे. या सर्व्हेमध्ये 52 टक्के नागरिकांनी या वर्षीच्या सुरुवातीला ही लस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली आहे तर 36 टक्के लोकांनी ही लस मे ते ऑगस्टदरम्यान उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली आहे. याचबरोबर 12 टक्के लोकांनी या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची आशा व्यक्त केली आहे.

  आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

  सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) देण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दररोज रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना लस देण्यात येणार आहे. याचबरोबर स्वछता कर्मचारी, पोलिस आणि सैनिकांना या लस देण्यात येणार आहे. घरामधून कचरा जमा करणाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. तर चौथ्या चरणात इतर सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी डेटाबेस तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही लस बाजारात येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

  काळा गॉगल, हातात काठी, 100 वर्षांच्या मुंबईच्या आजी Facebook वर हिट

  पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी भारतात लसीकरणासाठी मोठी व्यवस्था उभारल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार आणि राज्यांनी लसीकरणाची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून भारताच्या वैश्विक लसीकरण कार्यक्रमांतर्गत (Universal Immunization Program) दरवर्षी 55 कोटी नागरिकांना लसीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीने सर्वात मोठी लोकशाही काम करते त्याच पद्धतीने सर्व पातळीवरील संस्थांच्या मदतीने हे लसीकरण यशस्वी केले जाईल. याचबरोबर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी (Health Secretary Rajesh Bhushan) ज्या भारतीयाला या लसीची गरज आहे त्याला लस देण्यात येणार असल्याची घोषणा आज केली आहे. त्यामुळे आता ही लस बाजारात कधी उपलब्ध होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  First published:

  Tags: Corona vaccine