बापरे! आता 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका? वाचा काय सांगतो रिपोर्ट

बापरे! आता 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका? वाचा काय सांगतो रिपोर्ट

वैज्ञानिक हे शोधण्याचा प्रयत्न करीत होते की लोकांच्या पर्सन प्रोफाइल जसे की काम आणि घरामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?

  • Share this:

लंडन, 29 जुलै : एकीकडे जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, दुसरीकडे कोरोनावर लस अद्याप सापडलेली नाही आहे. मात्र जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना संदर्भात वेगवेगळे रिसर्च करत आहेत. यातच एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोनाची लागण 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये होण्याचा धोका जास्त आहे. मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठासह आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने अमेरिका आणि ब्रिटनमधील सुमारे 2000 लोकांचा सर्वेक्षण करण्यात आले.

ब्रिटीश टेलिग्राफ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तनुसार, या सर्वेक्षणातील वैज्ञानिक हे शोधण्याचा प्रयत्न करीत होते की लोकांच्या पर्सन प्रोफाइल जसे की काम आणि घरामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? त्याच वेळी, संशोधकांना असे आढळले की 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्गाचा धोका जास्त असतो.

वाचा-सिगरेट, तंबाखूचे सेवन करत असाल तर सावधान! कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका जास्त

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा उंच लोकांमध्ये असलेला धोका, यातून हे दिसून येते की कोरोना हवेमुळे पसरतो. ड्रॉपलेटमुळे सध्या सर्वाधिक लोकं संक्रमित होत असल्याचे समोर आले आहे.

वाचा-मुंबईकरांनो सावधान! झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त - सर्व्हे

मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इव्हान कॉन्टोपॅन्टलिस म्हणाले की, या अभ्यासातून असे दिसून आले आहे की केवळ ड्रॉपलेटच खालून पसरत नाही तर त्यांचा संसर्ग हा हवेतूनही होऊ शकतो. ते म्हणाले की, घरातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हवा शुद्धीकरण करणे गरजेचे केले पाहिजे.

वाचा-भारतात 'कोरोना'साथ गेली तिसऱ्या टप्प्यात? NCDCच्या सर्व्हेत धक्कादायक निष्कर्ष

या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की ब्रिटनमध्ये नैसर्गिक विज्ञान पदवी घेतलेल्या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी आहे. मुक्त विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रोफेसर पॉल आनंद म्हणाले की, सध्या कोरोनाचे रुप बदलत चालले आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक घटकांचा संसर्गावर काय परिणाम होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 29, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या