Home /News /coronavirus-latest-news /

आईनं गमावले प्राण, मात्र सोळा दिवसाच्या चिमुकलीनं केली कोरोनावर मात; पाहा VIDEO

आईनं गमावले प्राण, मात्र सोळा दिवसाच्या चिमुकलीनं केली कोरोनावर मात; पाहा VIDEO

महिलेला उपचारासाठी इलाहाबादहून भोपाळला (Bhopal) घेऊन जाण्यात आलं. मात्र, डिलीवरीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या नवजात मुलीलाही (New born) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

    भोपाळ 20 मे : कोरोनामुळे (Coronavirus) अनेक तरुणांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचं चित्र आहे. अशात अवघ्या सोळा दिवसांच्या नवजात चिमुकलीनं मात्र कोरोनावर मात केली आहे. या चिमुकलीच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. महिलेला उपचारासाठी इलाहाबादहून भोपाळला (Bhopal) घेऊन जाण्यात आलं. मात्र, डिलीवरीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या नवजात मुलीलाही (New born) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या घटनेमुळे हैराण झालेले वडील आपल्या चिमुकलीला रुग्णालयातच दाखल करुन इलाहाबादला निघून गेले. मात्र, आता ते अत्यंत आनंदी आहेत, की त्यांची मुलगी आता बरी होऊन त्यांच्यासोबत घरी आली आहे. 17 दिवसाआधी इलाहाबादमध्ये उपचार न मिळाल्यानं रुही खान यांना 700 किलोमीटर दूर भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी ती 35 आठवड्यांची गर्भवती होती. त्यांची RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. ऑक्सिजन लेवलही 80 वर आली होती. यातच त्यांनी बाळाला जन्म दिला. ही चिमुकली जन्माला आली तेव्हा तीदेखील पॉझिटिव्ह होती. मात्र, मुलीच्या जन्मानंतर लगेचच आईचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये या कोरोनाबाधित चिमुकलीला वाचवणं अत्यंत कठीण होतं. रुग्णालयात या चिमुकलीवर सोळा दिवस उपचार सुरू होते. डॉक्टर आणि रुग्णालयातील पूर्ण स्टाफनं दिवसरात्र या चिमुकलीची काळजी घेतली. स्टाफच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी जन्माला आली, तेव्हा तिचं वजन अत्यंत कमी होतं. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. डॉक्टरांची टीम नर्सिंग स्टाफसह तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहिली. जेव्हा RT-PCR रिपोर्टही पॉझिटिव्ह आला तेव्हा डॉक्टरही चिंतेत होते. मात्र, सर्वांनी या चिमुकलीची दिवसरात्र काळजी घेत तिच्यावर उपचार केले. आता या चिमुकलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं रुग्णालयातही आनंदाचं वातावरण पसरलं. मुलीचे वडील राशिद खान यांनी हार मानली होती. पत्नीचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर मुलगी वाचेल, असं त्यांना वाटलंही नव्हतं. ते म्हणाले, की पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीला डॉक्टरांच्या विश्वासावर सोडून मी इलाहाबादला परत आलो होतो. इथे मुलीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य होते. रुग्णालयातील लोकांनी आपल्या मुलीची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली आणि आता ती बरं होऊन घरी आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus cases, Small baby

    पुढील बातम्या