वेलिंग्टन,14 डिसेंबर : कोरोना विषाणू (Corona Virus) विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. यात त्यांच्या प्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण ठामपणे आणि योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता देशाचे भवितव्य ठरवते. या संघर्षात एका महिला पंतप्रधानांनी कठोर नियमांची अंमलबजावणी करत आपला देश कोरोनामुक्त करण्यात यश मिळवलं आहे. या यशस्वी महिला पंतप्रधान आहेत न्यूझीलंडच्या जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern).
नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सगळ्या जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या महाभयानक विळख्यातून सुटका करून घेण्यात न्यूझीलंडनं यश मिळवलं असून, हा देश कोरोनाच्या साथीतून पूर्णपणे मुक्त झाला आहे. त्यामुळे सगळ्या जगाला दिलासा मिळाला आहे. या यशात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अत्यंत कठोर निर्णयही ठामपणे घेतले आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याकडे जातीनं लक्ष दिलं.
आपला देश कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट होताच त्या इतक्या आनंदी झाल्या की त्यांनी चक्क नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या दोन आठवड्यांपासून इथं एकही कोरोना बाधित रुग्ण (Corona Patient) आढळलेला नाही. त्यामुळं न्यूझीलंडमध्ये कोरोना साथीमुळे घालण्यात आलेले सगळे निर्बंध हटवण्यात आले असून, केवळ दक्षता म्हणून अगदी प्राथमिक टप्प्यातील काही नियम कायम ठेवण्यात आले आहेत. अर्थात परदेशातून न्यूझीलंडमध्ये येण्यास अद्याप मनाई आहे. परदेशांसाठी न्यूझीलंडच्या सीमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. 25 मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
आता इथं लोक मुक्तपणे संचार करु शकत असून, एकत्र येऊ शकतात. सुरक्षित अंतराचा नियम नाही... कोरोनाचे भय नाही... सगळीकडे या मुक्तपणाचा आनंद पसरला आहे. जगण्यातला तणाव दूर झाल्यानं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.
"I did a little dance."
New Zealand Prime Minister Jacinda Ardern says when she heard there were no more active coronavirus cases in the country she started "dancing around the lounge." https://t.co/xCxkIT3bDu pic.twitter.com/ctZtchD6eL
— ABC News (@ABC) June 8, 2020
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) म्हणाल्या, ‘आपण आता एका सुरक्षित स्थितीत आहोत. या स्थितीत येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता आम्ही आमचं सर्व लक्ष देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यावर केंद्रित करणार आहोत. अर्थात, कोरोना विषाणूच्या साथीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, त्यामुळं आमचं काम संपलेलं नाही पण देशात सध्या एकही कोरोना रुग्ण नाही, ही खूप मोठी संधी आहे. या मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचे श्रेय जनतेला आहे. त्यांनी कठोर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सहकार्य केलं, त्यामुळं आज देश ही आव्हानात्मक लढाई जिंकला आहे.’
या सहकार्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारी मानले आहेत.
हे वाचा-जगभरात Gmail, YouTube डाउन
जगभरात सध्या 72 कोटी 2 लाख एक हजार 716 कोरोना बाधित रुग्ण असून, आतापर्यंत 1 कोटी 61 लाख एक हजार 758 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक रुग्ण म्हणजे 16,24,6771 रुग्ण आहेत. 299,493 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारत दुसऱ्या स्थानावर असून, इथं 98 लाख 57 हजार 29 कोरोनाबाधित असून, आतापर्यंत 1 लाख 43 हजार 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये ब्राझील, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, इटली, तुर्कस्तान, स्पेन, अर्जेंटिना, कोलंबिया, जर्मनी, मेक्सिको, पोलंड आणि इराण या देशांचा समावेश आहे.