जिनिव्हा, 25 नोव्हेंबर : आता कुठं लोकं कोरोना महामारीतून सावरत होते. अशातच आता पुन्हा एकदा कोरोना जगाला वेठीस धरू लागला आहे. युरोपमध्ये वेगाने पसरणारा कोरोना आता दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि बोत्सवानामध्ये (Botswana) नव्या स्वरूपात समोर आला आहे. व्हायरसच्या नवीन म्यूटेंटने जगातील वैज्ञानिक आणि डब्ल्यूएचओ (WHO) चिंतेत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वेगाने पसरणाऱ्या नवीन कोरोनाव्हायरस प्रकारावर चर्चा केली.
याबद्दल, लंडनमधील UCL जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक François Balloux यांनी सायन्स मीडिया सेंटरने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, b.1.1529 नावाच्या नवीन व्हेरीएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन होत आहेत. हा प्रकार उपचार न केलेल्या एचआयव्ही/एड्स रुग्णापासून विकसित झाला असावा असा अंदाज आहे. बॅलॉक्स म्हणाले की तीव्र संसर्गादरम्यान हा विकसित होण्याची शक्यता असते. या टप्प्यावर संसर्ग किती पसरू शकतो याचा अंदाज लावणे कठीण आहे. काही काळ त्याचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे.
नवीन व्हायरस तज्ञांचा अभ्यास सुरू
विषाणूच्या प्रकारांबाबत, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसने एका निवेदनात म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेत अशी 22 प्रकरणे आढळून आली आहेत. NICD चे कार्यकारी संचालक एड्रियन पूरन म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत एक नवीन प्रकार आढळून आला आहे ही चिंतेची बाब आहे, कारण सध्या डेटा मर्यादित आहे, आमचे तज्ञ नवीन व्हायरस प्रकार समजून घेण्यासाठी सर्व स्थापित निरिक्षण करणाऱ्या प्रणालींसोबत काम करत आहेत. त्याचे इतर संभाव्य परिणाम काय असू शकतात याचाही ते अभ्यास करत आहेत. इतरही अनेक मुद्द्यांवर संशोधन चालू आहे. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने यापूर्वी सांगितले होते की ते पुढील आठवड्यात व्हायरसच्या प्रकाराबाबत दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांना भेटतील.
Corona returns in China: चीन, रशिया, ब्रिटनमध्ये कोरोना रिटर्न
बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही संसर्ग
दक्षिण आफ्रिकेने देखील नवीन विषाणू प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विषाणूशास्त्रज्ञ टुलिओ डी ऑलिव्हेरा यांनी सांगितले की, B.1.1529 नावाच्या नवीन आवृत्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्यूटेंट दिसून आले आहे. ते म्हणाले की दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांमध्ये बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये देखील हे आढळून आले आहे. ते फार लवकर पसरू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 100 नवीन प्रकरणे पाहिली गेली आणि बुधवारी दैनंदिन संसर्गाची संख्या 1,200 हून अधिक झाली.
पुन्हा Corona Alert! गेल्या 24 तासांत 500 जणांचा मृत्यू
प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत
आरोग्य मंत्री जो फाहला म्हणाले की, नवीन विषाणू प्रकारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दक्षिण आफ्रिकेला गेल्या वर्षी विषाणूची बीटा आवृत्ती सापडली. आता दक्षिण आफ्रिकेला एकाधिक म्यूटेंटसह एक नवीन COVID-19 प्रकार आढळला आहे. साथीच्या रोगाचा सर्वात मोठा परिणाम दक्षिण आफ्रिकेत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona spread, South africa