मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चिंतेत भर! भारतात आढळला कोरोनाचा आणखी एक घातक व्हेरियंट, 7 दिवसातच शरीरात होतोय मोठा बदल

चिंतेत भर! भारतात आढळला कोरोनाचा आणखी एक घातक व्हेरियंट, 7 दिवसातच शरीरात होतोय मोठा बदल

आता भारतात कोरोनाचा आणखी एक नवा आणि घातक व्हेरियंट (Corona Variant)  आढळून आला आहे. हा इतका भयंकर आहे, की याचं संक्रमण होताच सात दिवसांच्या आतच रुग्णाचं वजन कमी होऊ शकतं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 06 जून : कोरोना विषाणू (Coronavirus) सातत्यानं आपलं रूप बदलत असून दिवसेंदिवस तो अधिक घातक होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून याचे नवनवीन व्हेरियंट (Corona Variants) समोर येत आहेत. अशात आता भारतात कोरोनाचा आणखी एक नवा आणि घातक व्हेरियंट आढळून आला आहे. हा इतका भयंकर आहे, की याचं संक्रमण होताच सात दिवसांच्या आतच रुग्णाचं वजन कमी होऊ शकतं. आधी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये (Brazil) आढळला होता. त्याठिकाणाहून याचा एकच व्हेरियंट भारतात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की ब्राझीलहून कोरोना विषाणूचे दोन व्हेरियंट भारतात आले आहेत. दुसऱ्या व्हेरियंटचं नाव बी.1.1.28.2 आहे. शास्त्रज्ञांनी या व्हेरियंटचं परीक्षण एका उंदरावर केलं. याचे परिणाम थक्क करणारे होते. असं समोर आलं आहे, की लागण झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांच्या आतच याची ओळख करता येऊ शकते. हा इतका भयंकर आहे, की यामुळे अवघ्या सात दिवसांमध्येच रुग्णाचं वजन कमी होतं. यासोबतच डेल्टा व्हेरियंटप्रमाणंच हादेखील शरीरातील अँटीबॉडीजची क्षमता कमी करतो. 1 टक्के कोरोना बाधितांमुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण;अन्यथा हटले असते निर्बंध पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, की बी.1.1.28.2 व्हेरियंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळला होता. या व्हेरियंटची जीनोम सिक्वेंसिंग करून नंतर परीक्षण करण्यात आलं. सध्या भारतात याची जास्त प्रकरणं नाही. मात्र, डेल्टा व्हेरिंयटचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कॉर्बेवॅक्सला मान्यता मिळाल्यास देशात उपलब्ध होईल सर्वात स्वस्त लस विदेशातून परतलेल्या दोन लोकांच्या सॅम्पलची सिक्वेंसिंग केली गेली होती. कोरोनातून बरं होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणं नव्हती. मात्र, सॅम्पल सिक्वेंसिंगनंतर बी.1.1.28.2 व्हेरियंट असल्याचं माहिती होताच उंदरावर याचं सात दिवस परीक्षण केलं गेलं. यातील तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतील भागात संसर्ग पसरल्यामुळे झाला.
First published:

Tags: Corona updates, Corona virus in india

पुढील बातम्या